लोककला व आदिवासी कलांचे सादरीकरण

25 Sep 2024 18:07:52
नागपूर,
Vibhaagstareey Utsav केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, नागपूर द्वारे २ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात सायंकाळी६:३० वाजता “विभागस्तरीय महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नागपूर विभागातील पारंपरिक, लोककला आणि आदिवासी कलांचे सादरीकरण होणार असून प्रादेशिक कलांचा प्रचार आणि प्रसार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशातील विविध विभागातही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

FJASUIF 
नागपूर विभागात आयोजित या महोत्सवात विविध पारंपारिक, लोककला आणि आदिवासी कलांच्या सादरीकरणासोबत चित्रकला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. Vibhaagstareey Utsav सदर कार्यक्रम निःशुल्क असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे नागपूरचे प्रभारी संचालक के. के. गोपालकृष्णन यांनी केले आहे .
Powered By Sangraha 9.0