अंबादेवीचा नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून

26 Sep 2024 17:55:16
तभा वृत्तसेवा
 
 
अमरावती, 
 
 
Ambadevi Sansthan Amravati विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार ३ ऑ्नटोबरला पहाटे ५ वाजता संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे व त्यांच्या पत्नींच्याहस्ते श्री अंबादेवीचा अभिषेक व नंतर घटस्थापना होईल. सकाळी ८.३० वाजता संस्थानचे सचिव दीपक श्रीमाळी व पत्नींच्याहस्ते ध्वजारोहण होईल. रोज सकाळी ५ वाजता देवीला अभिषेक करण्यात येईल. Ambadevi Sansthan Amravati यंंदा नवमीच्या होमाला शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० पासून सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पूर्णाहुती होईल. यंदा होमाचे यजमान श्रीमाळी व कर्वे दाम्पत्य असतील.
 हेही वाचा : नवरात्रीमध्ये शनीच्या चाल ७ राशींसाठी फायदेशीर!
 
 
Ambadevi Sansthan Amravati
 
 हेही वाचा : नवरात्रीमध्ये ह्या १० कामं मुळे होणार त्रास...जाणून घ्या
Ambadevi Sansthan Amravati दरवर्षी प्रमाणे विजयादशमीनिमित्त श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीची संयुक्त पालखी दुपारी ४ वाजता सीमोल्लंघनासाठी प्रस्थान करेल. ब्रिजलाल बियाणी कॉलेज मधील परंपरागत स्थानी महाआरती होवून पालखी मंदिरात परत येईल. नवरात्री निमित्ताने नऊ दिवस प्रवचनाची ब्रह्मलीन संत अच्युत महाराजांची परंपरा त्यांचे शिष्य संत सचिन देव महाराज चालवत आहेत. Ambadevi Sansthan Amravati त्यांची प्रवचनमाला रोज सकाळी ८.३० ते १० या वेळात श्री अंबादेवी कीर्तन सभागृह, रामकृष्ण विद्यालय रोड, अंबागेट जवळ येथे ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६ या वेळात तर तपोवन येथील बंधू भगीनींसाठी शनिवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २ या वेळात करण्यात आली आहे.
हेही वाचा :  माय माझी महाकाली तू सत्वाची गं धार...!  
 
 
Ambadevi Sansthan Amravati परंपरेप्रमाणे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून महिला व पुरुष यांच्या मंदिर प्रवेशाच्या स्वतंत्र रांगा असतील व दक्षिण दरवाजातून भाविक गण एकवीरा मंदिराकडे प्रस्थान करतील. महिलांसाठी ओटी स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नऊही दिवस विविध भजनी मंडळे भजने सादर करतील. दरवर्षी प्रमाणे भाविक भक्तांनी शिस्तीत व शांततेने दर्शन घेवून व्यवस्थापनाला सहकार्य करावे, अशी विनंती अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केली आहे. हेही वाचा : यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहिती का? घ्या जाणून
 
 
Powered By Sangraha 9.0