हिंदू संस्थानांची बदनामी केल्यास अब्रुनुकसानीचा दावा करू

27 Sep 2024 20:06:50
- भाजपा खासदार डॉ. अनील बोंडे यांचा इशारा

मुंबई, 
महाविकास आघाडीकडून हिंदू मंदिर संस्थानांबाबत संभ्रम पसरवून बदनामी करण्याचा उद्योग सुरू आहे. कोणताही पुरावा नसताना कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला भूखंड वितरणाच्या मुद्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रयत्न केला जात आहे. देवस्थानांबाबत गलिच्छ राजकारण करू नये. श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर आणि संस्थानाद्वारे चालवल्या जाणार्‍या संस्था या बावनकुळे यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या नसतानाही जमिनीच्या मुद्यावरून चुकीच्या बातम्या माध्यमांमधून मविआचे नेते पेरत असतील तर, त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा भाजपा खासदार Dr. Anil Bonde डॉ. अनील बोंडे दिला.
 
 
Dr. Anil Bonde
 
भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रपरिषदेत Dr. Anil Bonde डॉ. बोंडे बोलत होते. ही संस्था बावनकुळे यांच्या मालकीची नसून, त्याचे व्यवस्थापन ट्रस्टद्वारे केले जाते, हे संस्थान व्यावसायिक कार्य करीत नाही. दर दोन वर्षांनी संस्थान अध्यक्षांची निवड केली जाते, तशी निवड होऊन सध्या बावनकुळे हे मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. विश्वस्त मंडळाने घेतलेल्या अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. हे संस्थान धार्मिक, अध्यात्मिक कार्यातच नव्हे तर, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही सक्रीय आहे. संस्थानातर्फे चालवल्या जाणार्‍या अन्नछत्रात रोज जवळपास ५ हजार गरजूंना जेवण दिले जाते. गरजूंची या ना त्या प्रकारे मदत करतानाच संस्थानामार्फत ८०० गरजू, गरीब विद्यार्थ्यांना नाममात्र अशा १ रुपयात विद्यादान जाते. अशाप्रकारे सामाजिक कार्यात काम करणार्‍या मंदिर संस्थान आणि बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेण्याचे हीन काम मविआचे नेते करीत आहेत. आपले हात भ्रष्टाचाराने किती बरबटले आहेत, हे न पाहता खोटे आरोप केले जात आहेत. नागपुरात काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी किती भूखंडांचे श्रीखंड लाटले, यांची यादी आपल्याकडे असल्याचे सांगत डॉ. बोंडे वानगीदाखल सतीश चतुर्वेदी यांचे कारनामे सांगितले. त्यांच्या नागपूरमधील लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेमार्फत तब्बल ३.२८ आणि १३.३० हेक्टर जमीन संस्थेच्या नावाखाली लाटली असल्याचा घणाघात बोंडे यांनी केला. कुठलेही सामाजिक कार्य न करणार्‍या या संस्थेला ही जमीन कशी वितरित करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0