मविआच्या ‘खोट्या फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक

27 Sep 2024 21:48:26
- भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंचा हल्लाबोल

मुंबई, 
उबाठा सेनेचा भोंगा आणि मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल, त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या खोट्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून, त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरविण्याच्या उद्योगाला मिळालेली चपराक आहे, अशी टीका प्रदेश  Keshav Upadhyay भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.
 

raut 
 
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत उपाध्ये बोलत होते. मविआ सरकार सत्तेतून गेल्यानंतर संजय राऊत सैरभैर झाले असून, महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे. त्यामुळेच सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, पुण्यात खाचगी जागेत ट्र्क रुतला असताना रस्त्यातील खड्ड्यात ट्र्क घुसला असल्याचे वृत्त पसरवणे, महाराष्ट्राचा मणिपूर होणार, अशी भाकिते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट, अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिली आणि सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन ती फसली, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.
 
 
Keshav Upadhyay सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगाशी आला आहे. खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायाने त्यांना त्याची फळे भोगावी लागणार असून, महाविकास आघाडीने यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी व राऊत यांचा भोंगा बंद करावा, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिला. खोटी जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा खा. राऊत आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0