नागपूर विद्यापीठात ई-समर्थ प्रणाली कार्यान्वित

27 Sep 2024 17:00:27
नागपूर,
RTMNU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ई-समर्थ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. विद्यापीठातील विद्यार्थी विषयक, विद्या विषयक, वित्त विषयक तसेच विद्यापीठ प्रशासनातील विविध कार्याचे ऑनलाईन कार्यान्वयन करण्याकरीता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले ई-समर्थ पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

FGTUR
 
साधारणतः गेल्या २ वर्षांपासून ई-समर्थ सर्व समावेशक ऑनलाईन कार्यप्रणालीच्या कार्यान्वयनासाठी केद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. RTMNU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने देखील गत काही महिन्यात याच्या अंमलबजावणीने वेग धरला असून आता सामान्य प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त विद्यार्थी संबंधित प्रवेश, परीक्षा व निकाल यासाठी सुद्धा ई-समर्थ प्रणालीची अंमलबजावणी करण्याची तयारी विद्यापीठाने सुरु केली आहे.
 
सदर प्रणालीमध्ये विद्यापीठाच्या कार्याशी संबंधित ४० पेक्षा अधिक मॉड्युल्य असून यापैकी अधिकांश मॉड्युल्यवर नोंदणी करुन अधिकार्यांचे प्रशिक्षण व संबंधित विभागाचे डाटा अपलोडींग याकरीता कालबद्ध नियोजन करून येत्या काही काळात विद्यापीठाची सर्व प्रशासकीय कामे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे. RTMNU हिवाळी २०२४ परीक्षा संदर्भात विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर शैक्षणिक विभागांच्या परीक्षा संबंधित कार्यवाही या प्रणालीद्वारे घेण्याचे ठरवले आहे. तसेच सदर प्रणालीचा उपयोग शक्यतोवर उन्हाळी २०२५ परीक्षांपासून विद्यापीठाच्या सर्व परीक्षा संदर्भात करावयाचे नियोजन आहे. ई-समर्थ प्रणालीमुळे परीक्षांशी संबंधित खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. शिवाय प्रशासकीय कामकाजात गती येत वेळेची बचत होणार आहे. या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे.
Powered By Sangraha 9.0