जयशंकर यांची सिंगापूर, उझबेकिस्तानच्या समकक्षांसोबत चर्चा

    दिनांक :28-Sep-2024
Total Views |
न्यू यॉर्क, 
परराष्ट्र व्यवहार मंत्री S. Jaishankar एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पृष्ठभूमीवर संयुक्त अरब अमिरात (यूएई), उझबेकिस्तान आणि डेन्मार्कमधील आपल्या समकक्षांची भेट घेऊन चर्चा केली. भारत आणि या देशांमधील संबंध बळकट करणे तसेच मैत्रिपूर्ण संबंधांचा विस्तार करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. जयशंकर संयुक्त ७९ व्या आमसभेसाठी उपस्थित आहेत. जयशंकर यांनी शुक्रवारी सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विव्हियन बालकृष्णन् यांची भेट घेतली होती.
 
 
Jaishankar
 
बालकृष्णन् यांच्यासोबतच्या चर्चेने दिवसाचा शेवट चांगल्या प्रकारे झाला, असे जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. S. Jaishankar जयशंकर यांनी उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियोर सायडोव्ह यांची भेट घेतली. न्यू यॉर्कमध्ये आज सायडोव्ह यांच्यासोबत चांगली झाली. या देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीमुळे समाधानी आहे, असे जयशंकर यांनी या भेटीनंतर एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तुर्कमेनिस्तानचे परराष्ट्र मंत्री रासित मेरोडो यांच्यासोबतही सकारात्मक बैठक झाली. त्यांना तुर्कमेनिस्तान राष्ट्रीय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मैत्रिपूर्ण संबंध आणखी वाढवण्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली, असे जयशंकर यांनी एक्सवर म्हटले आहे.