यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Supriya Sule : बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आणि सगळीकडून निषेध नोंदवण्यात आला. शाळेतच काम करणारा सफाई कर्मचारी अक्षय शिंदेने नीच कृत्य केल्याचं उघड झालं. गृहमंत्र्यांनी त्वरित हालचाल करून नराधमाला अटक केली. आता या आरोपीचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर झाल्याची बातमी आली आहे. न्याय हा न्यायालयातच झाला पाहिजे. रस्त्यावरील न्याय लोकशाही देशाला शोभत नाही. परंतु भाजपाचे सरकार आल्यापासून विरोधक लोकांना रस्त्यावर येण्यास उकसवत आहेत. अक्षय शिंदेच्या प्रकरणात काही लोक शिंदेचे समर्थक झाले आहेत की काय, अशी शंका मनात निर्माण होते. अक्षयने केलेला गुन्हा अक्षम्य आहे. तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे. अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याने दुःख वाटून घेण्याचं कारण नाही आणि त्याच्या मृत्यूमुळे कुणाला दुःख होत असेल तर त्या दुःखी झालेल्या माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर, त्याच्या माणूसपणावर संशय घ्यायला बरीच जागा ज्या विरोधकांना नराधमाच्या एन्काऊंटरमुळे त्रास झाला आहे. त्यांच्या त्रासाचं मूळ कारण आपण शोधलं पाहिजे. त्यांना अक्षय शिंदेची काळजी वाटत नाही, तर त्यांना स्वतःची काळजी वाटते. कारण नराधमाला शिक्षा व्हावी म्हणून लोक निषेध नोंदवतात व त्याच्या मृत्यूनंतर लोक आनंद व्यक्त करतात. म्हणजे लोक जागृत झालेले आहेत.
दुसरी गोष्ट ही घटना काही उत्साही लोकांनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचे फोटो लावले, ज्यात फडणवीसांच्या हातात बंदूक दाखवण्यात आली आहे आणि ‘बदला पुरा’ असे लिहिलेले पोस्टर्सही लावलेले आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार, हे माझ्यासाठी खूप आहे, जी मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे. देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदुका दाखवल्या तर आम्ही इथून देवेंद्रजींना संविधान दाखवू.
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना मुलांवरील संस्काराचा प्रश्न पडला आहे; चांगलेच आहे. पण देवेंद्र फडणवीसांचा बंदुकधारी फोटो यापेक्षाही काही गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आहेत. त्याबाबत यांची मते महाराष्ट्राला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून पवार कुटुंबीयांनी कोणकोणते उपक्रम आजपर्यंत राबविले? मुलांवर संस्कार व्हावे म्हणून त्यांनी कोणती पुस्तके वाचावीत, असं सुळे यांना वाटतं? शरद पवार संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात उपस्थित राहतात, जिथे मुलांवर संस्कार करणार्या रामावर आणि समर्थांवर गलिच्छ भाषेत टीका होते, निवेदिता सराफ महिलेवरही विनाकारण टीका होते, तेव्हा मुलांवर वाईट संस्कार होत नाहीत का? शिवचरित्राचा प्रचार व प्रसार करणारे बाबासाहेब पुरंदरे यांना धमक्या दिल्या गेल्या, शिव्या दिल्या गेल्या तेव्हा मुलांवर वाईट संस्कार होत नाही का? समर्थ रामदास हे महाराष्ट्राचे थोर संत, त्यांच्याविषयी जेव्हा पुरावे नसतानाही अभद्र बोललं जातं, तेव्हा काय मुलांवर चांगले होतात का? ज्ञानाची परंपरा चालवणार्या भांडारकर प्राच्य शोध संस्थेवर हल्ला झाला, काही ज्ञानसाधना नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा कोणते संस्कार मुलांवर झाले? ज्ञानसाधना नष्ट करणे ही जिहादी संस्कृती आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची ही संस्कृती नाही. या महापुरुषांनी ज्ञानोपासना केलेली आहे. मग ज्ञानसाधना नष्ट करणार्यांच्या मागे जे खंबीरपणे उभे राहतात, या महापुरुषांचे गुन्हेगार नाहीत का?
हा शाहू, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच. हे महापुरुष महानच होते. पण त्यांचे कोणते विचार सुप्रिया सुळे यांना आवडतात आणि ते मुलांनी आत्मसात केले पाहिजेत, हे त्या सांगू शकतात का? बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानाची उपासना केली, उच्चशिक्षित झाले. कुण्या हिंदुत्ववाद्यालाही कधी सुचलं असं पाकिस्तानवर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल सर्वांच्याच मनात आदर आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्याने देऊन सुप्रिया सुळे मुलांना प्रोत्साहित करू शकतात का? त्यांना बाबासाहेबांचे कोणते गुण आवडतात, हे त्या सांगू शकतात का? संजय राऊत हे सुप्रिया सुळे यांचे सहकारी आहेत. त्यांची आघाडी आहे. राऊत हे टीव्हीवर उघडपणे भाषा वापरतात, महिलांना व इतर नेत्यांना शिवीगाळ करतात, तेव्हा मुलांवर वाईट संस्कार होत नाहीत का? आपल्यापेक्षा वयाने अगदी लहान असलेल्या तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. पण पवारांच्या संस्कारात वाढलेले आव्हाड, या तरुणाला गोंजारून त्याच्यावर चांगले संस्कार करू शकत नव्हते का? त्यांना असंवैधानिक मार्ग का अवलंबावा लागला? उल्लेख ‘पेशवा’ असा करून जातीयवाद रुजवून कोणते संस्कार मुलांवर होणार आहेत? सावरकर म्हणजे देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे. राहुल गांधी सावरकरांवर खोटे आरोप करतात. पवार हे प्रचंड व्यासंगी आणि अभ्यासू नेते असल्यामुळे त्यांना राहुल गांधींचा खोटारडेपणा माहीत आहे. मग संस्कार करण्याच्या दृष्टीने वडिलकीचा अधिकार घेऊन ते राहुल गांधींना दोन गोष्टी का सांगत नाहीत? त्यांना सावरकरांचा खरा इतिहास का सांगत नाहीत? सावरकरांवर गलिच्छ आरोप केल्याने किती वाईट संस्कार मुलांवर होतील?
यावर Supriya Sule सुप्रिया सुळे यांनी खरंच काम करण्याची व या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे. त्यांना लहान मुलांची चिंता आहे. त्या स्त्री आहेत, त्यांच्यात मातृत्व आहे. या मातृत्वाला जागून त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी आणि मुलांवर चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबाच असणार आहे. सर्वांच्याच त्यांना शुभेच्छा आहेत! आता फडणवीसांचं एक ताजं उदाहरण घेऊन लेखाचा समारोप करूया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात महिलेने ही तोडफोड आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, आपली बहीण चिडली असेल, तिची व्यथा असेल तर आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल, तर ते देखील समजून घेऊ. त्यामागे काही वेगळं असेल तर तेही समजून घेऊ. आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना एन्ट्री देतो, कोणतीही अडवणूक आपल्या मंत्रालयात अशा परिस्थितीत कधी लोक पहिल्या मजल्यावरून जाळीवर उडी मारतात, कधी लोकं रोष प्रकट करतात; याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत असं नाही. त्यांच्या काही अडचणी असतात. त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो.
महिलांविषयी व राज्यातल्या जनतेविषयी अशी भावना मनात ठेवणारा व अशी सभ्य प्रतिक्रिया देणारा गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अर्थ फडणवीसांवर खर्या अर्थाने शाहू, फुले, आंबेडकरांचे संस्कार झाले आहेत. त्यांचे हे सभ्य व सज्जनतेचे वागणे हेच मुलांसाठी संस्कार ठरणार आहेत.