ऑस्करसाठी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची निवड

28 Sep 2024 13:16:43
मुंबई,  
Swaragandharva Sudhir Phadke चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९७व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. जगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ऑस्कर अवॉर्ड्स' मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. यंदा ऑस्कर २०२५साठी भारताकडून 'लापता लेडीज' या चित्रपटाची निवड केल्याची माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दिली. त्या पाठोपाठ आता एका मराठी चित्रपटाची देखील ऑस्करच्या शर्यतीमध्ये एण्ट्री झाली आहे. ऑस्करच्या शर्यतीमध्ये एण्ट्री करणारा चित्रपट म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके.
 
 
fadake
 
फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून २९ चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतले गेले होते. त्यात योगेश देशपांडे दिग्दर्शित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे. त्यामुळे आता मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे. Swaragandharva Sudhir Phadke 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Powered By Sangraha 9.0