मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
aravind kejariwal : ज्या देशाचे सरन्यायाधीश पंतप्रधानांना गणपतीचे मोदक खायला घरी बोलावतात, तेथे आम्हाला काय न्याय मिळणार? ही व्यथा व्यक्त केली आहे पाळीव पोपटाने... रोज सकाळी उठून पोपटपंची करणारा एक सर्वज्ञानी असा पोपट, दुसर्यांदा पिंजर्यात अडकण्याच्या भीतीने धास्तावलेला आहे. पूर्वीचे तुरुंगातील शौचास जाण्यापासून इतरही अनेक अनुभव पाठीशी असल्याने कदाचित पोपटराव साहेबांना पुन्हा त्याच वातावरणात जाण्याच्या कल्पनेनेच पोटात गोळा उठल्याचे दिसते. आता बेताल बडबडीवर अंकुश लागण्याची आणि तुरुंगात जाण्याची वेळ आल्याने सैरभैर झालेले पोपटराव गरळ ओकताना दिसत आहे. ‘मरता क्या न करता...’ अशी परिस्थिती आता पोपटरावांची यावेळी झालेली आहे.
aravind kejariwal : तुरुंगातील मागील शंभर दिवसांतील अनुभवांवर साहेबांनी पुस्तकच लिहिण्याची तयारी केली होती म्हणे. काढणे सुरू होते. बरेच टिपण काढलेले आहेत, असे पोपटराव स्वतः जामिनावर बाहेर आल्यानंतर सांगत होते. ते तुरुंगातून बाहेरही आले, पण त्यांचे पुस्तक मात्र अजून आले नाही. पण त्यांनी ज्या काही नोंदी घेतल्या आहेत, टिपण काढले आहेत, त्यावरून पोपटरावांचा तुरुंगातला अनुभव काही फार चांगला होता असे दिसत नाही, हे स्पष्ट मुळात पोपटराव हा ‘एहसान फरामोश’ आहे. येथे मुद्दाम हिंदी शब्द वापरलाय्. कारण ‘कृतघ्न’ शब्द पोपटरावासारख्या ‘नॉटी’ व्यक्तीची पराकोटीच्या नीच वृत्तीची महानता अधोरेखित करण्यासाठी कमी पडतो. आता असे म्हणण्याचे कारण बघा, भाजपाशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवावर यांचं सरकार स्थापन झालं, ते न्यायालयाच्या कृपेने. हा स्वतः पोपटराव आज तुरुंगाबाहेर वावरत आणि बेताल बडबडत आहे, तेदेखील न्यायालयाच्या कृपेनेच. कारण कोट्यवधींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हा पाळीव पोपट सध्या न्यायालयाच्या कृपेनेच मोकळा श्वास घेत अनेकांवर तोंडसुख घेत आहे. एवढंच नव्हे, तर नुकताच ज्या न्यायालयाच्या निर्णयाने पोपट बावचळला आहे. त्यावर अकांडतांडव करताना, छाती बडवताना दिसत आहे. हे सगळं नाट्य करण्याचे स्वातंत्र्यदेखील निकाल त्याच न्यायालयाच्या कृपेने पोपटाला लाभलेले आहे. कारण न्यायालयाने शिक्षा ठोठावली. त्यानंतर पोपटाच्या वकिलाने वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. तेव्हा न्यायालयाने तो अर्ज मंजूर करत सहानुभूतीने एक महिन्यासाठी शिक्षेला स्थगिती देत अपिलाची संधी दिली.
aravind kejariwal : न्यायालयाच्या उपकारावर जगत असताना पुन्हा आरोपीच्या पिंजर्यात उभं करण्याचा पोपट आणि त्याच्या मालकाचा धंदा झाला आहे. यांच्या बाजूने निकाल दिला तर न्यायालये चांगली आणि यांच्या विरोधात निकाल दिला तर ‘‘खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत मी एक सिनेमा काढणार आहे. ‘बाई मी विकत घेतला न्याय.’ कारण या देशात न्याय मिळत नाही, विकत घ्यावा लागतो. न्यायव्यवस्थेचं संघीकरण आहे,’’ असे आसूड ओढायचे. बरं न्यायालयांवर असे एकदा नव्हे, अनेकदा खालच्या पातळीवर वारंवार टीका करूनही न्यायालय या पोपटलालवर न्यायालयाच्या अवमानप्रकरणी ‘सुमोटो’ कारवाई का करत नाही, हे देखील आश्चर्य आहे. हा पोपट वाट्टेल त्याला म्हणजे मग ती महिला असो किंवा पुरुष कशाचीही तमा न बाळगता अत्यंत अश्लील भाषेत माध्यमांच्या कॅमेर्यांसमोर करतो. शिवाय न्यायालयांना, न्यायमूर्तींच्याबद्दलदेखील वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करतो. अशा नॉटी व्यक्तीला न्यायालय जेव्हा जामीन देतो तेव्हा त्यावर टाकण्यात येणार्या बंधनात, अनुचित, आक्षेपार्ह वक्तव्य किंवा कुणाबद्दल अश्लील भाष्य केल्यास जामीन रद्द केला जाईल, अशी एक अट का टाकत नाही, हे देखील कळण्यापलीकडले आहे. आरोपी जामिनावर असताना निर्दोष मुक्त झाल्याप्रमाणे उघड समाजात फिरतो, शिवीगाळ करतो, याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. यावर न्यायालयेदेखील दुर्लक्ष करतात आणि याचमुळे अशा व्यक्तींना अजून जोर चढतो. काय गरज होती न्यायालयाला एका आरोपीला अपिलासाठी एक महिन्याचा वेळ देण्याची! नाही तेव्हा एका रात्रीत अपिलात जाणार्यांना कशाला एक महिना लागतो. फारच कळवळा आला असेल न्यायालयाला या पोपटाचा दोन-तीन दिवस द्यायचे होते. एकीकडे खणखणीत निर्णय देऊन लगेच गुळमुळीत भूमिका घेतल्यानेच अशा नॉटी व्यक्ती निरंकुश होतात आणि मग समाजात सर्रास उपद्रव करत फिरतात. याचे जितेजागते उत्तम उदाहरण म्हणजे हा पाळीव पोपट होय...
aravind kejariwal : एका गोष्टीचं मात्र यावेळी आश्चर्यच आहे. फडणवीस-अजित पवार सरकार पाडण्यासाठी पोपटाचे साहेब सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. मिळाला होता. तिघाडी सरकार पाडल्याप्रकरणी पोपटाचे साहेब सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, आमदार अपात्रताप्रकरणी साहेब सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, पक्ष आणि चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातही पोपटाचे साहेब सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, पोपट स्वतः पत्राचाळ प्रकरणी जामीन मिळविण्यासाठी कनिष्ठ न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. जामीनही मिळाला होता. आता नुकत्याच आलेल्या या निर्णयाविरोधात पोपट कोर्टात न्यायाची भीक मागायला जाणार असल्याचं सांगत आहे. आता न्यायपालिकांचे संघीकरण झाले आहे, सरकारच्या दबावाखाली न्यायालये काम करत आहेत, न्याय विकत घ्यावा लागत आहे तर मग आम्हाला न्याय कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित करणारा पोपट, जेथे न्याय मिळणारच नाही, अशी पूर्ण खात्री असताना पुन्हा त्याच न्यायालयाकडे दयेची भीक मागायला जात आहे? ज्या न्यायालयाने पोपटाविरोधात निर्णय दिला, तो दबावाखाली किंवा विकत दिल्याचा आरोप करत असताना त्याच न्यायालयाकडे अपिलासाठी थोडा अवधी देण्याची भीक का मागितली? आणि त्याच न्यायालयाने एक महिन्याच्या टाकलेले दयेचे तुकडे का लपकले? स्वाभिमानाने सांगायचे होते. सरकारच्या दबावाखाली दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे एक महिन्याची तुमची भीक नको मुळात स्वाभिमान विकलेली लाचार वृत्ती असला निडरपणा दाखवूच शकत नाही. अशा प्रवृत्ती चोर्या करून पुन्हा सहानुभूती गोळा करण्यासाठी ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळतात, जनतेची दिशाभूल करून राजकीय पोळी शेकण्यासाठी तमाशा उभा करतात. वास्तवात अशा प्रवृत्ती तळवे चाटणार्या औलादी असतात, हेच वास्तव आहे.
- ९२७०३३३८८६