इस्रायलने मारले हिजबुल्लाचे ५० टक्के नेतृत्व

29 Sep 2024 05:50:00
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
Israel-Hezbollah war : पेजर हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्ला दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ला होती. मात्र त्याआधी १९ सप्टेंबरला इस्रायलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले. यावेळी हिजबुल्लाची १००० रॉकेट्स भुईसपाट केली गेली. रॉकेटच्या माध्यमातून हिजबुल्लाला इस्त्रायलवर निशाणा साधायचा होता. हिजबुल्ला हमासला पाठिंबा देणारी दहशतवादी संघटना आहे. हमासला पाठिंबा देत हिजबुल्ला लेबनॉनमधुन इस्त्रायलवर रॉकेट फायर करण्याचे काम करत आहे.
 
 
pager
 
हिजबुल्लाच्या ८७९ सदस्यांचा मृत्यू
लेबनॉन येथे स्फोट आणि वॉकीटॉकी स्फोटात हिजबुल्लाच्या गुप्त लष्करी दस्तऐवजांवरून एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत; ज्यात १३१ इराणी आणि ७९ येमेनचा समावेश असून यामध्ये एकूण २९१ वरिष्ठ अधिकारी आहेत. हल्ल्यात दळणवळण संसाधनांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. पेजर स्फोटात सुमारे ९ जण मारले गेले तर तीन हजार जखमी झाले आहेत.
 
 
हिजबुल्लाकडून निवड का?
Israel-Hezbollah war : हिजबुल्लाच्या दृष्टीने विचार करता पेजर हे सुरक्षेच्या दृष्टीने इतर कोणत्याही संपर्कासाठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा अधिक सुरक्षित होते. पेजरच्या वापरामुळे अत्याधुनिक कम्युनिकेशन ट्रेसिंग यंत्रणांना या दहशतवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवणं कठीण झाले, म्हणून हिजबुल्लाकडून पेजरची निवड. मोबाईल संपर्क केल्याने शत्रू आपल्या मोबाईलमधील माहिती काढून घेतात. अनेकदा मोबाईल हॅक होण्याच्या घटना मात्र पेजर वापरले गेले. हे उपकरण वापरण्यास सोपे असून हॅक करणे सोपे नाही, म्हणून पेजरचा वापर केला जात होता. इस्रायलयच्या दृष्टीने विचार केला, तर पेजर हे एकाच वेळी मोठ्या संख्येनं हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचं एक प्रभावी माध्यम ठरलं. कारण पेजर वैयक्तिक वापरासाठी असल्यामुळे त्या त्या व्यक्तीलाच लक्ष्य करणं सोपं यामुळे लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या नेटवर्कलाच एक मोठं भगदाड पाडण्याची आणि त्यातून कमकुवत करण्याची संधी मोसादला उपलब्ध झाली. हेझबोलाकडून पेजर खरेदी केले जाणार असल्याचा सुगावा मोसादला आधीच लागल्यामुळे त्यांना पेजरमध्ये स्फोटकं आधीच फिट करणं शक्य झालं. त्यांनी पेजर बनवणार्‍या कंपनीशी संगनमत करून या पेजरमध्ये विशिष्ट स्फोटकांची क्षमता असणार्‍या मिनी चिप बसवल्या. रिमोट ट्रिगर प्रणालीनं सज्ज होत्या. पेजर्सचा पुरवठा करताना हिजबुल्लाने तैवानमधून ५,००० पेजर्स मागवले होते. ते वर्षाच्या सुरुवातीला हिजबुल्लापर्यंत पोहोचले होते. पेजरमध्ये स्फोटके भरण्यात आली. पेजरचे वाटप हिजबुल्लामध्ये करण्यात आले होते. यावेळी इस्त्रायलने योग्य संधी पाहून धमाका केला. लिथियम बॅटरी बहुतेक आधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाते आणि उच्च उष्णतेमध्येही त्यांचा स्फोट नाही म्हणून लिथियम बॅटरी सुरक्षित मानली जाते. तरीही पद्धतशीरपणे ज्या प्रकारे स्फोट झाले, तो इलेक्ट्रॉनिक युद्धाचा प्रकार होता.
 

pagerattack 
 
इस्रायल-लेबनॉनचे एकमेकांवर हल्ले
Israel-Hezbollah war : इस्रायलच्या सैन्य दलाने शुक्रवारी बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाला. अकीलने हिजबुल्लाच्या रडवान फोर्स आणि जिहाद कौन्सिल या लष्करी गटांचा प्रमुख म्हणून काम आहे. बैरूतमधील अमेरिकी दूतावासावर १९८३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात अकिलचा हात होता. इस्रायल आणि लेबनॉन या देशांनी शुक्रवारी एकमेकांवर हल्ले केले. हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर तीन हल्ले केले असून त्यात १४० क्षेपणास्त्रे डागली. त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान आठ जण ठार झाले ६० जखमी झाले. या हल्ल्यांत बैरूतमध्ये अनेक इमारती, वाहनांचे नुकसान झाले. हिजबुल्लाने इस्रायलच्या उत्तर भागांत क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रं मोकळ्या भागात पडली. लेबनॉनमध्ये १७ सप्टेंबर रोजी एकाच वेळी जवळपास २८०० पेजरमध्ये छुप्या अप्रत्यक्ष हल्ल्यामध्ये इस्रायलनं २८०० हेझबोला सदस्यांना एकाच वेळी लक्ष्य केलं.
 
 
वॉकीटॉकींचा स्फोट
१८ सप्टेंबर रोजी लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, ते वॉकीटॉकी जपानच्या आयकॉम कंपनीचे आहेत. ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, त्या मॉडेलची निर्मिती कंपनीने दशकभरापूर्वीच बंद केली होती, असं कंपनीने स्पष्ट केलं तरीही आम्ही यासंदर्भात तपास करत आहोत, असं कंपनीने म्हटलं आहे.
 
 
सायबर युद्धांमध्ये इस्रायलचा मोर्चा सांभाळणारी गुप्तचर यंत्रणा
Israel-Hezbollah war : सायबर युद्धांमध्ये इस्रायलचा मोर्चा सांभाळणारी गुप्तचर यंत्रणा युनिट-८२०० ने हिजबुल्लावर हल्ले सुरू केले आहेत. युनिट-८२०० ही सायबर संस्था पेजर्स व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटकं बसवणे, कंट्रोलद्वारे त्यांचं नियंत्रण मिळवणे व एकाच वेळी त्यांचा स्फोट घडवून आणणे या तिन्ही गोष्टींवर ‘युनिट-८२००’ ने अनेक महिने काम केलं होतं. युनिट-८२०० मधील सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातले गुणी कर्मचारी आहेत. इस्रायलची संरक्षण क्षमता, सायबर सुरक्षा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. युनिट-८२०० व या संस्थेतील कर्मचारी शत्रुराष्ट्रांची माहिती गोळा करणे, माहिती गुप्तचर यंत्रणा व संरक्षण यंत्रणांना पुरवणे; त्या माहितीचं विश्लेषण करणे, सायबर सुरक्षा पुरविणे यांसारखी कामे करतात. या युनिटची थेट यूएस नॅशनल सिक्यूरिटी एजन्सीशी तुलना केली जाते. इस्रायली सरकार युनिट-८२०० च्या कारवाया व मोहिमांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर येऊ देत नाही.
 
 
स्फोटासाठी पेजरचाच पर्याय का?
इस्रायलकडे संहारक अस्त्र असूनही पेजरचाच पर्याय का निवडला? इस्रायल मोठ्या प्रमाणात हमास, हिजबुल्ला दहशतवाद्यांच्या विरुद्ध हवाई हल्ले करत आहे. याचा मुख्य उद्देश आहे की, त्यांच्या महत्त्वाच्या नेतृत्वाला मारावे. यामुळे या संघटनांची शक्ती कमी होईल. आजूबाजूच्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा. कारण ज्या वेळेला निर्दोष नागरिक मारले जातात, त्यामुळे त्या समाजामध्ये इस्रायलच्या विरुद्ध अजून भावना निर्माण होते. नेतृत्व मारणे इतके सोपे नाही. कारण नेतृत्व वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असते. त्यावेळेला इस्रायलला माहिती मिळते की, नेतृत्व या घरांमध्ये लपले आहे, ज्या वेळेला हवाई हल्ले केले जातात. परंतु अनेक वेळा मिळालेली गुप्तहेर माहिती चुकीची ठरते. याउलट पेजर हल्ल्यामध्ये इस्रायलने २० मिनिटांच्या आत जुनाट तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण पद्धतीचा वापर करून ४० ते ५० टक्के हिजबुल्ला नेतृत्व खतम केले; जे एक मोठे यश आहे. म्हणजेच जे हवाई दलाच्या हल्ल्यातून शक्य होत नव्हते ते केवळ नावीन्यपूर्ण युद्ध कल्पना वापरून इस्रायलने केले.
 
 
Israel-Hezbollah war : युनिट-८२०० सारखी संस्था आपण भारताच्या सायबर कमांडमध्ये निर्माण करू शकतो का? भारतामध्ये अजूनही ३० ते ४० टक्के आणि इतर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट ही चीनमधून आयात होत आहे. त्याचा भारताच्या विरोधात शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो का? वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या युद्धामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात म्हणून भारतानेसुद्धा अशा युद्ध पद्धतीचा विचार करावा आणि अशा नावीन्यपूर्ण संकल्पना पाकिस्तान, चीन, दहशतवादी, नक्षलवाद्यांच्या विरोधात कशा वापरता येतील, यावर करावे; ज्यामुळे देश जास्त सुरक्षित होईल.
 
 
प्रत्येक पेजरमध्ये तीन ग्राम विस्फोटक
प्रत्येक पेजरमध्ये तीन ग्राम विस्फोटक असल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. पेजर हे संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. लेबनॉन आणि शेजारी देशांपैकी सीरियात एकाच वेळी हजारो पेजर्सचा स्फोट झाला. हा स्फोट आहे की घातपात? अनेक हिजबुल्लाशी संबंधित होते. हा स्फोट पेजर अधिक गरम झाल्याने झाला. पेजर ठेवणार्‍या हिजबुल्लामुळे इतर आजूबाजूच्या लोकांना याचा फटका बसला. हिजबुल्लाने म्हटले की, इस्रायलने हजारो पेजर्समधील सिग्नल हॅक केले. इतक्या वारंवारतेने मेसेज पाठवले की, ज्यामुळे बॅटरी गरम झाल्याने स्फोट झाला.
 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- ९०९६७०१२५३
Powered By Sangraha 9.0