सूरसप्तकची दीदींना स्वरांजली

"इमोर्टल लता " कार्यक्रमातून

    दिनांक :29-Sep-2024
Total Views |
नागपूर,
Laxminagar Nagpur स्वरसम्राज्ञी स्व. लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त 'इमोर्टल लता ' या कार्यक्रमाचे आयोजन करून सूरसप्तक संस्थेने दीदींना स्वरसुमनांजली अर्पण केली. दीदींच्या वाढदिवशीच स्थापना झालेल्या नागपुरातील अग्रगण्य सूरसप्तक संस्थेने संस्थेच्या वर्धापन दिनी खास लतादीदींची सुमधुर गाणी सादर करून औचित्य साधलं. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २८सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला होता.या कार्यक्रमाची संकल्पना अध्यक्ष सुचित्रा कातरकर तर निर्मिती प्रा. पद्मजा सिन्हा यांची होती.

mkrt 
 
  
दिल तेरा दिवाना ,ये नयन डरे डरे , तुम्हे देखती हूँ , ये दिल तुम बिन , ओ रामजी , रहे ना रहे हम , करवटें बदलते रहे , वादा करले साजना ,जाने कैसे कब कहा , दिल की नजरसे , तुम मेरे सामने अशी लतादीदींची २९अत्यंत गाजलेली सुमधुर एकल व युगल गीते सादर करण्याचं शिवधनुष्य मुकुल पांडे Laxminagar Nagpur, डॉ. अमोल कुळकर्णी, निसर्गराज, विजय देशपांडे, , धीरज आटे, आदित्य फडके , योगेश देशपांडे, प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतिक्षा पट्टलवार , अश्विनी लुले , डॉ. ऋचा येनुरकर , संगीता भगत , अर्चना उचके, अनुजा जोशी , लता पटेल या गायकांनी पेलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रसिकांच्या पसंतीस आलेल्या गीतांनी वन्स मोअर घेतला. गायक कलाकारांना नचिकेत देव , पंकज यादव , प्रमोद बावणे , विजय देशपांडे, नंदू गोहाणे , तुषार विघ्ने , गौरव टांकसाळे या वादक कलाकारांनी समर्पक साथसंगत केली. आसावरी गलांडेचं रसाळ निवेदन कार्यक्रमाची उंची वाढवून गेलं. लतादीदींना देण्यात येणाऱ्या या स्वरांजलीस रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
                                                                                                                              सौजन्य:वर्षा किडे,कुलकर्णी,संपर्क मित्र