नांगलोई येथील खळबळजनक घटना... दारू तस्कराने हवालदाराला कारने चिरडले

29 Sep 2024 10:32:28
नवी दिल्ली, 
Nangloi crime शनिवारी रात्री उशिरा नांगलोई भागात शोध मोहिमेदरम्यान थांबण्याचा इशारा दिला असता, एका दारू तस्कराने दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलला त्याच्या कारने जोरदार धडक दिली आणि त्याला 10 मीटरपर्यंत ओढले.

Nangloi crime
 
हेही वाचा : इस्रायलने मारले हिजबुल्लाचे ५० टक्के नेतृत्व 
प्रकरण दिल्लीतील नांगलोई भागातील आहे. येथे कॉन्स्टेबल संदीप यांना दारू पुरवठादाराच्या कारने चिरडले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगलोई पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला दारू पुरवठादाराची गाडी येत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला पण ती न थांबली आणि कॉन्स्टेबलला धडकली. Nangloi crime या घटनेत हवालदाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी कार जप्त केली असली तरी कारमधून दारु सापडलेली नाही. कार चालक फरार आहे. ही घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आहेत.
Powered By Sangraha 9.0