पारव्याची आई... देवी जगदंबा !

29 Sep 2024 18:32:32
मंगरुळनाथ, 
तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान Navratri 2024 भवानीमाता जगदंबदेवी तीर्थक्षेत्र पारवा येथे ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील श्रीक्षेत्र पारवा येथील भवानीमाता जगदंबदेवी तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र प्राचीन व जागृत आहे. येथे शेकडो वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. हे तीर्थक्षेत्र शिवकालीन असल्याची आख्यायिका आहे. यावर्षी ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान तिर्थक्षेत्रावर नवरात्र उसत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ४ ऑक्टोबर पासून कारंजा येथील हभप सुनील गुरुजी ठाकरे यांचे मधुर वाणीतून श्रीमद भागवत सप्ताह, ५ ऑक्टोबर रोजी गुप्ता मेलोडीज यांचे वतीने रात्री ८ वाजता आर्केष्ट्रा, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता साक्षी डिगंबर लुंगे यांचे कीर्तन, ७ ऑक्टोबर रोजी भाग्यश्री विजय लुंगे यांचे कीर्तन, ८ ऑक्टोबर रोजी हभप प्रल्हाद महाराज कळंब यांचे कीर्तन, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हभप दत्ता महाराज रोकडे यांचे कीर्तन, १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता सांकृतिक कार्यक्रम, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता अष्टमीचा होम हवन यज्ञ, सकाळी ११ वाजता हभप दत्ता महाराज पाकधने अकोला यांचे काल्याचे कीर्तन व जोगवा महाप्रसादाचे आयोजन केले आहे. हेही वाचा : मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि !...काय आहे अर्थ..
 
 

jagadamba mata 
 
रात्री ८ वाजता सांकृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. देणगीदारांच्या Navratri 2024  सहकार्याने नवरात्र उत्सवात भाविकांसाठी दररोज दुपारी १२ ते ४ दरम्यान प्रसाद वितरण केले जाणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम व ग्रामीण रुग्णालया मंगरुळनाथ यांच्या वतीने आरोग्य शिबीर नेत्ररोगतज्ञ स्वीती गोटे दहातोंडे वाशीम यांचेद्वारा नेत्र तपासणी शिबीर, ७ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान भारत आरोग्य योजना व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना वाशीम यांचेद्वारा आरोग्य तपासणी शिबीर, ८ ऑक्टोबर रोजी सिटी हॉस्पिटल अकोला यांचे वतीने आरोग्य तपासणी शिबीर, ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी वाशीम व तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत आरोग्य शिबीर, ११ ऑक्टोबर रोजी आस्था हॉस्पिटल अकोला येथील डॉ. सतीश पडघन यांचे वतीने संधिवात, सांधे व गुडघे दुःखी, मधुमेह व ह्दयरोग यासंबंधी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी पालखी मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता केली जाणार आहे. भाविकांनी या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थान कमेटी, नवरात्र उत्सव समिती व गट ग्रामपंचायत पारवा व गावकरी मंडळी पारवा, बोरव्हा व लखमापुर यांनी केले आहे.
 हेही वाचा : युवकांसाठी आनंद वार्ता ! सरकारकडून मिळणार दरमहा ५००० रुपये...
 
Powered By Sangraha 9.0