इम्रान खानच्या विरोधात दहशतवादाचे नवीन गुन्हे

    दिनांक :30-Sep-2024
Total Views |
इस्लामाबाद, 
सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान Imran Khan इम्रान खान यांच्याविरोधात पंजाब पोलिसांनी दहशतवादाची तीन नवीन प्रकरणे दाखल इम्रान खान यांच्या आवाहनानुसार त्यांच्या पक्षाने रावळपिंडीच्या लियाकत परिसरात केलेल्या हिंसक निदर्शनांमुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
Imran Khan
 
खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमिन गांडापूर आणि पक्षाचे अध्यक्ष बॅ. गोहर खान यांच्यासह Imran Khan इम्रान खान यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, असे वृत्त एक्सप्रेस ट्रिब्युनने दिले. रावळपिंडीच्या न्यू टाऊन आणि सिव्हिल पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, कलम १४४ चे उल्लंघन आणि दहशतवादाशी संबंधित इतर आरोप करण्यात आले आहेत.