नवरात्रोत्सवासाठी वर्धा सज्ज

30 Sep 2024 20:38:57
तभा वृत्तसेवा
 
वर्धा, 
 
Navratri 2024-Wardha नवरात्रोत्सवाला गुरुवार 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. 9 दिवसांच्या कालावधीत विविध सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून आपल्या मंडळाचा मंडप आकर्षक दिसावा, याकरिता चढाओढ असते. Navratri 2024-Wardha दरम्यान, शहरातील काही भागात कलकत्ता येथील कारागिरांकडून मंडप उभारणीचे काम सुरूआहे. यावर्षी स्वागत कमानीच आकर्षण ठरत आहेत. 9 दिवस चालणार्‍या या दुर्गोत्सवात अनेक ठिकाणी रास दांडिया, गरबाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
 
 

Navratri 2024-Wardha 
 
 
Navratri 2024-Wardha नवरात्रोत्सवासाठी जिल्ह्यात विविध सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारणे सुरू केले आहे. अनेकांचे काम अंतिम टप्प्यात आले असून आकर्षक झाँकीसह विद्युत रोषणाई आणि देखावेही उभारण्यात आले आहेत. विदर्भात वर्धा येथील नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे. येथील व्यापारी नवरात्रोत्सवात सक्रीय असतात. Navratri 2024-Wardha सतत 9 दिवसही लंगरचे आयोजन असते. शहरातील गोलबाजार, सराफलाइन, कपडा लाइन, पत्रावळी लाइन, कच्छी लाइन, पटेल चौक, आर्वी नाका, शास्त्री चौक नवरात्रोत्सवात रोषणाईने उजळून जातो. अनेक मंडळांनी आकर्षक देखावे तयार केले आहे.
 
 
 
नवरात्रोत्सवात शहरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते. Navratri 2024-Wardha आकर्षक घट, सजावटीचे सहित्य आणि पुजेच्या साहित्यांनी दुकाने सजली आहेत. शहरात नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. यात येथील व्यापारी मंडळ तन-मन-धनाने सहकार्य करतात. नवरात्रोत्सवाच्या अगदी दुसर्‍या दिवसापासून ठिकठिकाणी अन्नदानाला सुरूवात होते. माँ नवदुर्गा पूजा उत्सव समिती आर्वीनाका येथे 13 फूट उंचीची दुर्गामूर्ती यावर्षी स्थापन होणार आहे. नऊ वर्षांपासून शेगाव येथील मूर्तीकार संजय काटोळे हे मूर्तीची निर्मिती करीत आहे. यावर्षी त्यांनी 13 फूट उंचीची देवीची मूर्ती तयार केली आहे.
Powered By Sangraha 9.0