लंडनवरून परताच अनुष्कावर संतापले नेटकरी! VIDEO

04 Sep 2024 10:49:11
मुंबई,
Anushka returning from London गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. तिनं पती विराट कोहली आणि मुलांसोबत तिथे राहण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. तिथे दोघं किर्तनात सहभागी झाल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले होते. आता या सगळ्यात अनुष्का ही अखेर भारतात परतली आहे. मुंबई विमानतळावर तिला स्पॉट करण्यात आलं आहे. मात्र, ती एकटी दिसली. मुलं आणि विराट यावेळी तिच्यासोबत दिसले नाही. अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मानं काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. जॅकेटपासून पॅन्टपर्यंत संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे तिनं परिधान केले आहेत. पापाराझींना पाहताच अनुष्का ही त्यांच्याकडे पाहून हसते आणि हाय-हॅलो करताना दिसते. त्यानंतर अनुष्का कारमध्येबसून तिथून निघून जाते. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

ANUSHKA
अनुष्का शर्माला पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे काही नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत तर काही तिला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'तिसऱ्या बाळाची तयारी केली, त्यामुळे वहिणी जाड दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिला सांगा की लंडनला परत जा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आमची वहिणी कशी आहेस?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पैसे कमावण्यासाठी परत आली.' Anushka returning from London दुसरा नेटकरी म्हणाला, 'ब्लॅक कमांडो. तिसरा नेटकरी म्हणाला, इथे पैसे कमावण्यासाठी आली. तिथे काम तर मिळत नाही. अनुष्काविषयी बोलायचे झाले तर तिनं याचवर्षी 15 फेब्रुवारी रोजी अकायला जन्म दिला. तिची डिलिव्हरी ही लंडनमध्ये झाली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना ही बातमी दिली होती. या आधी त्यांना एक मुलगी असून वामिका असं तिचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं सांगितलं होतं की ती लवकरच भारतात येणार आहे. तिच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही.
 
Powered By Sangraha 9.0