माफसूमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

04 Sep 2024 19:29:27
- एकल जगभरात विशेष भर
 
नागपूर,
Biochemistry in One Health : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय डेरी अनुसंधान संस्थानचे संचालक तथा कुलगुरु डॉ. धीर सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी माफसूचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुविज्ञान डॉ. एस. व्ही. उपाध्ये, सोसायटीचे डॉ. व्ही. गिरीशकुमार, सरचिटणीस डॉ. निर्मल सांगवन, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आ. पा. सोमकुवर तसेच परिसंवादाचे आयोजन सचिव डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे हे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. सोसायटी ऑफ वन हेल्थ बायोकेमिस्टस्च्या माध्यमातून वार्षिक आणि राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
mafoos
 
या परिषदेत Biochemistry in One Health वन हेल्थमध्ये जिवरसायनशास्त्र या विषयावर चर्चासत्र करण्यात आले असून देशभरातून शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. आपल्या भाषणादरम्यान डॉ. धीर सिंग आणि डॉ. नितीन पाटील यांनी जगभरात वन हेल्थ (एकल आरोग्य) यावर दिला जाणारा भर, महत्व आणि वन हेल्थ संकल्पनेत जिवरसायनशास्त्राचे योगदान यावर मार्गदर्शन केले. जिवरसायानशास्त्रातील भरीव योगदानाबद्दल कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ जिवरसायन शास्त्रज्ञ डॉ. एम. आर. एल. प्रभू जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे माजी प्रा. डॉ. आर. एन. शिरभाते यांना सुध्दा सन्मानीत करण्यात आले. संचालन डॉ. शायनी तसेच आभार डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0