दोन क्रू सदस्यांचे मृतदेह सापडले

04 Sep 2024 20:25:39
- तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त
- तिसर्‍याचा शोध सुरू
 
पोरबंदर, 
Coast Guard helicopter crashed : गुजरातच्या किनार्‍याजवळील अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक दलाचे (आयसीजी) कोसळल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन क्रू सदस्यांपैकी वैमानिक आणि एका गोताखोराचा मृतदेह सापडला, तर तिसर्‍याचा शोध सुरू आहे, असे अधिकार्‍यांनी बुधवारी सांगितले. तटरक्षक दलाचे प्रवक्ते अमित उनियाल यांनी सांगितले की, कमांडंट विपीन बाबू आणि गोताखोर करणसिंग यांचे मृतदेह मंगळवारी रात्री बाहेर काढण्यात आले, तर अन्य वैमानिक राकेश राणाचा शोध सुरू.
 
 
helicopter crashed
 
ते म्हणाले, आयसीजीच्या अत्याधुनिक हलक्या विमानामध्ये एकूण चार क्रू सदस्य होते. गोताखोर गौतमकुमारला घटनेनंतर लगेचच वाचवण्यात आले, तर पायलट आणि दोन गोताखोरांसह इतर तिघांचा शोध सुरू होता. पायलट विपीन बाबू आणि गोताखोर करणसिंग यांचे मृतदेह मंगळवारी रात्री बाहेर काढण्यात आले. ते म्हणाले, दुसरा पायलट राकेश राणा अद्याप बेपत्ता आहे. शोध घेण्यासाठी आम्ही चार जहाजे आणि एक विमान तैनात केले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष जप्त करण्यात आले आहे.
 
 
 
Coast Guard helicopter crashed : दरम्यान, मंगळवारी रात्री समुद्रातून दोन मृतदेह सापडल्यानंतर पोरबंदरमधील नवीबंदर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. वृत्तानुसार, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये चार कर्मचारी होते. वैद्यकीय आपत्कालीन बचाव मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टर अज्ञात कारणांमुळे किनार्‍यापासून ३० नॉटिकल मैल समुद्रात कोसळले. तटरक्षक दलाने सांगितले की, दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर बचावलेला गोताखोर गौतमकुमार अजूनही रुग्णालयात दाखल आहे.
Powered By Sangraha 9.0