भारत-ब्रुनेईतील द्विपक्षीय संबंध बदलले भागीदारीत

04 Sep 2024 19:39:25
- पंतप्रधान मोदी यांची सुलतान बोल्कियाह यांच्यासोबत चर्चा
 
बंदर सेरी बगवान, 
India and Brunei : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्कियाह यांच्यात संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि परस्पर प्रादेशिक व जागतिक मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर भारत आणि ब्रुनेईने बुधवारी द्विपक्षीय संबंध भागीदारीत बदलले. नरेंद्र मोदी ब्रुनेईचा दौरा करणारे पहिलेच पंतप्रधान ठरले असून, सुल्तान बोल्कियाह यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या इस्ताना नुरुल इमान येथे नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. भारत आणि ब्रुनेईतील बळकट संबंधांमुळे ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला बळकटी मिळणार आहे. नरेंद्र मोदी आणि एच. एम. सुलतान हाजी हसनल बोल्कियाह यांच्यात बंदर सेरी बगवान येथे आज फलदायी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी वर्धित भागीदारीचे स्वागत केले, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
Modi - Sultan Bolkiah
 
India and Brunei : दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य औषधक्षेत्र, क्षमता बांधणी, संस्कृती आणि दोन्ही देशांमधील लोकांच्या संबंधांचा चर्चेदरम्यान आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर त्यांनी परस्परांचे मतही जाणून घेतल्याचे एक्सवर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरण आणि भारत-प्रशांतबाबतच्या भारतीय दृष्टिकोनात ब्रुनेई हा अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे, असे मोदी यांनी संबोधित करताना सांगितले. भारत ब्रुनेई यांनी शतकांपासून सांस्कृतिक संंबंध कसे सामायिक केले आहेत आणि सखोल सांस्कृतिक परंपरा द्विपक्षीय मैत्रीचा आधार आहेत, याचे वर्णन करून मोदींनी भाषणाची सुरुवात केली. बोल्कियाह यांच्या नेतृत्वात आपले संबंध दिवसेंदिवस अधिक बळकट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
४० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा
ब्रुनेईला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या ४० व्या वर्धापन सुलतान आणि नागरिकांना भारताच्या १४० कोटी नागरिकांच्या वतीने मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. भारत आणि ब्रुनेईमधील द्विपक्षीय संबंधांना ४० वर्षे झालीत, हा योगायोग असल्याचे मोदी यांनी म्हटले.
Powered By Sangraha 9.0