मोमीनपुरा, प्रदीपनगर भागातील घरांमध्ये पुराचे पाणी घुसले

04 Sep 2024 17:59:45
- महसूल विभागाकडून पाहणी

आर्णी, 
Mominpura : Flood water मुसळधार पावसामुळे आर्णी येथून वाहणारी अरुणावती नदी काठोकाठ भरुन वाहत होती व त्यामुळे शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या नाल्याला पुर आला व नाल्याकाठी मोमीनपुरा व प्रदीपनगर भागातील काही घरांमध्ये या नाल्या ला आलेल्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. जनजीवन विस्कळित होउन अधिक न होता व पुरापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरातील सामान सुरक्षित हलविण्यासाठी तयारी केली होती. माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहुरवाघ आर्णी खंड ३ च्या तलाठी ज्योती खोंडे, अमोल पुरी व तहसील कर्मचार्‍यांनी या भागाची पाहणी केली व सर्वे करण्याचे दिशानिर्देश तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी दिले.
 
 
Heavy rain
 
Mominpura : Flood water मोमीनपुर्‍यातील २०-२५ घरे व प्रदीपनगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले. बारभाई तांडा येथिल संदिप उकंडा जाधव गोठा पडल्याने त्यात शेळी दबून ठार झाली. वरुड तुका येथिल बांध फुटला व पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातुन वाहणारी पैनगंगा, अरुणावती, अडाण दिला पुर आल्याने याच्या तटवर्ती भागातिल शैतात पुराचे पाणी गेल्याने खरडली, पिके बुडाली शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. आमदार संदीप धुर्वे यांनी तत्काळ नुकसानाचे सर्वे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
Powered By Sangraha 9.0