आजपासून रेल्वेचे मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद

    दिनांक :04-Sep-2024
Total Views |
- पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू
 
नागपूर,
Nagpur Railway Station : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वार प्रवासी वाहनांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहे. रेल्वेच्या पुनर्विकासाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पश्चिमेकडील मुख्य प्रवेशमार्गावर पार्कींगचे काम केल्या जात आहे. प्रवासी वाहनांच्या प्रवेशासाठी ५ सप्टेंबर पासून पुढील आदेशापर्यंत तात्पुरते बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आहे.
 
 
main relwy
 
Nagpur Railway Station : रेल्वे प्रवाशाची सुरक्षा लक्षात घेवून रेल्वेने अनेक कामे हाती घेतले आहे. विकासकार्य सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी हा मार्ग बंद करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी, गणेश टेकडी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ सेवांसाठी नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विद्यमान मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र कार प्रवेशद्वार उघडले जाणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरात, सध्याची दुचाकी पार्किंग आणि प्रीपेड ऑटो स्टँड आरपीएफ कार्यालयासमोरील परिसरात हलवण्यात येणार असून त्यांना प्रवेश आणि बाहेर स्वतंत्र द्वार असतील. रेल्वेचे पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था राहणार आहे.
..