सेवा समितीच्या वतीने तान्हा पोळा

04 Sep 2024 19:29:56
नागपूर ,
Sundarban Hanuman Mandir सुंदरबन हनुमान मंदिर सेवा समितीच्या वतीने तान्हा पोळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमामध्ये जवळपास ५० बालगोपाल सहभागी झाले होते . सर्व सहभागी बालके आकर्षक पोशाख, सुंदर सजावट, आणि महत्त्वाचे म्हणजे चालू घडामोडीवर आधारित सुंदर संदेश देऊन सहभागी झाले होते. सेवा समितीच्या वतीने एकूण तीन बक्षिसे वाटण्यात आली. सोबतच, सर्व सहभागी बालकांना भेटवस्तू, बिस्किट पुडा, चॉकलेट, सुद्धा वितरित करण्यात आले.
 
  
minu
   
राज्याचे उपमुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे पाठविण्यात आलेल्या बक्षिसांचे सुद्धा वाटप यावेळी करण्यात आले. आपल्या प्रभागातील बालके, त्याचे पालक आणि नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि सजावट दही हंडी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केली.Sundarban Hanuman Mandir सहभागी बालकांचे परीक्षण ममता खटी आणि  सूर्यकांत जोशी यांनी केले.प्रसाद म्हणजे गोपाळकाला आणि सातळलेली डाळ अभिरुची भजन मंडळ मोठ्या सुंदरबन यातील महिला कार्यकर्त्यांनी तर सातळलेली डाळ माऊली भजन मंडळातील महिला कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर केली .त्याबद्दल त्या दोन्ही भजन मंडळाचे तसेच उपस्थित सर्व बालकांचे, संबंधित पालकांचे, स्थानिक नागरिकांचे, प्रमुख पाहुण्यांचे, आणि ज्यांनी ज्यांनी सेवा समितीला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे सुंदरबन हनुमान मंदिर सेवा समिती तर्फे आभार मानण्यात आले.
सौजन्य: स्मिता बोकारे,संपर्क मित्र  
 
Powered By Sangraha 9.0