तिकीट तपासणी मोहिमेत १५कोटीचा दंड वसूल

    दिनांक :04-Sep-2024
Total Views |
नागपूर, 
Ticket inspection campaigns : मध्य रेल्वे नागपूर एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत तिकीट तपासणीतून लक्षणीय महसूल मिळविला. प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी प्रवास करता यावा,यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते ऑगस्ट याच पाच महिन्यात २ लाख ४५ हजार ७४ प्रकरणांमधून दंड स्वरुपात १५कोटी १० लाख १० हजार ९५३ इतकी रक्कम गोळा केली. तपासणी मोहिमेत सर्वाधिक वसूल करण्यात आला. रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी वैध तिकीटांसह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.
 
 
rel fine
 
Ticket inspection campaigns : आरक्षणाशिवाय आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करु नयेत. प्रतीक्षा यादीत असलेले तिकिट ट्रेनच्या सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ३० मिनिटांपूर्वी तिकिटे रद्द करू शकतात. या वेळेत परतावा न मिळाल्यास प्रवाशांना अनारक्षित डब्यांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. तथापि, प्रतीक्षा यादीतील ई-तिकीटे प्रवासासाठी वैध नाहीत. अंशतः कन्फर्म तिकिटांच्या बाबतीत, कन्फर्म असलेले प्रवासी वाटप केलेल्या वर्गात प्रवास करू शकतात, तर प्रतीक्षा यादीतील तिकीट असलेले प्रवासी केवळ अनारक्षित डब्यांमध्ये प्रवास करू शकतात.