संस्कार भारतीच्या ‘सिने टॉकीज २०२४’ च्या पोस्टर, वेबसाईटचे अनावरण

06 Sep 2024 17:26:56
मुंबई, 
संस्कार भारतीच्या 'Cine Talkies 2024' ‘सिने टॉकीज २०२४’ च्या अधिकृत पोस्टर आणि वेबसाईटचे आज प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या प्रसंगी भारतीय चित्र साधनाचे विश्वस्त प्रमोद बापट उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष अरुण शेखर आणि भोजपुरी व हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता आणि प्रसारमाध्यममधील नावाजलेले व्यक्तिमत्व आनंद के. सिंह यांनी केले. प्रमोद बापट यांनी ‘वूड्स टू रूट्स’ या निवडीबद्दल संस्कार भारतीचे अभिनंदन केले, ज्यात विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टींना एकत्र येऊन त्यांच्या मूळ भारतीय मुळात आपले स्व शोधण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी भारतीय चित्र साधनाच्या अलिकडील प्रयत्नांचा उल्लेख केला, ज्यात चित्रपट निर्माते आणि युवकांमध्ये भारतीय सामग्रीचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. प्रमोद म्हणाले की, भारतीय कथा आणि कथाकथनाची प्रासंगिकता काळापासून आहे. कथाकथन ही एक कला आहे, जी आम्ही भारतीयांनी जगाला शिकवली. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी आता त्यांच्या मुळांकडे वळून नवीन कथा शोधण्याची गरज आहे.
 
 
sanskar-bharti-1
 
'Cine Talkies 2024' ‘सिने टॉकीज’सारखे उपक्रम समाजात आणि सिने क्षेत्र कुटुंबात विचारांच्या आदान-प्रदानास प्रोत्साहन देतील. बोनी कपूर यांनी देखील संस्कार भारतीचे अभिनंदन केले आणि उद्योगांमध्ये संवादाला चालना देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, चित्रपट उद्योगात ५० वर्षांच्या अनुभवातून त्यांनी नेहमी अप्रत्यक्षपणे भारतीय तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच एक मजबूत महिला पात्र साकारण्यावर विश्वास ठेवला. भारतीय चित्रपट आणि भारतीय कथा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आज आपण अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून कथा अधिक चांगल्या प्रकारे सांगण्यास सक्षम आहोत. त्यांचा संस्कार भारतीच्या घोषवाक्याशी संबंध आहे, ज्यात सिने जगताचा भारतीय द़ृष्टीकोन दर्शविला आहे, असे ते म्हणाले.
 
 
सिने टॉकीज २०२४ चे संयोजक म्हणून प्रख्यात मराठी अभिनेते आणि चित्रपट निर्माते सुनील बर्वे यांच्या घोषणेने आणि कोकण प्रांत संस्कार भारतीचे संघटक सचिव उदय शेवडे यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0