लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत धुसफूस

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
- अजित पवारांवर शिवसेनेची नाराजी
 
मुंबई, 
'Mukhyamantri Majhi Ladki Baheen' : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून राज्यात सत्ताधारी पक्षांत धुसफूस सुरू झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात या योजनेच्या जाहिराती आणि प्रसिद्धी साहित्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यावर शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांच्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना हायजॅक केल्याचा आरोप करून नाराजी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत दिली जाते.
 
 
Ajitpawar
 
'Mukhyamantri Majhi Ladki Baheen'  : देसाई म्हणाले की, सार्वजनिक कार्यक्रमात योजनेचे पूर्ण नाव न वापरणे शिष्टाचारानुसार नाही. या योजनेत मुख्यमंत्र्यांचे नाव असून, ते काढणे अन्यायकारक आहे. असे करायला नको होते. ही राज्य सरकारची योजना असून, अजित पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन चालायला हवे होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या पक्षाची सन्मान यात्रा सुरू केली होती. मुलींना आणि इतर योजनांतर्गत देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्याच्या लाभांवर लक्ष केंद्रित करणे हा त्याचा उद्देश आहे. प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिराती आणि इतर साहित्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या पूर्ण नावाऐवजी ‘माझी लाडकी बहीण’ असे नाव वापरले. अजित पवार यांच्या पक्षाने दोन व्हिडीओही जारी केले, या योजनेसाठी लाभार्थींनी अजित पवारांचे आभार मानले आहेत.