मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
- २ वर्षे २ महिन्योत ३२१ कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित

मुंबई, 
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्ष २ महिन्यांत ३२१ कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित करून ४० हजारांहून गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात गोरगरीब, गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी Chief Minister's Medical Assistance Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये, या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कक्षाचे काम सुरू आहे.
 
 
Medical Assistance Fund
 
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मिळवणे सोपे होण्यासाठी कक्षातर्फे विशेष पावले उचलण्यात येत आहेत. आता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. सहायता कक्षाच्या ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर अर्ज उपलब्ध करून दिला जात आहे तसेच Chief Minister's Medical Assistance Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांनी मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीत अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, किमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश करण्यात आला आहे.
 
चिमुकली बनली अ‍ॅम्बेसेडर
Chief Minister's Medical Assistance Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या १३ दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वाचले होते.