मुद्रा इव्हेंट्स प्रस्तुत गीतों की बरसात

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
नागपूर , 
Mudra events मुद्रा इव्हेंट्स प्रस्तुत, गीतों की बरसात हा संगीतमय कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात  पार पडला .ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका कांचन गडकरी, श्रुती गांधी, विशाखा मांगदे,  वंदना बर्डे  उपस्थित होत्या.दीप प्रज्वलन करून कांचन वहिनी यांनी देवीची प्रार्थना गाऊन शुभारंभ केला.मुद्रा इव्हेंट्सच्या गायक कलाकारांनी रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.. कीर्तीच्या सत्यम शिवम सुंदरम या गाण्यापासून सुरवात झाली.. नंतर तू जो मेरे सूर मे, सारिका थत्ते चे तेरे मेरे बीच मे, सोनाली अय्यर चे दीवानी मस्तानी, हाय रामा, नम्रता नागपूरे चे डार्लिंग, कजरा रे, सवित्रू पोफळी चे सांझ ढले, गार्गी मोरोणे चे दिया जले, ये मेरा दिल, मनिषा काशीकर चे आजा रे परदेसी, तेरे तेरे चेहरे से, अशा विविध प्रकारच्या गाण्यांची बरसात ह्या गायकांनी केली.पाहुणे कलाकार सारंग जोशी यांनी तर आपल्या गायनातून विविध गायकांचे गाणे सादर करून रसिकांना मोहविले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभांगी रायलू यांनी आपल्या हटके अंदाजात सुरेख केले.
 
kanchaqn 
 वादक कलाकार यांनी तर खूप अप्रतिम वादन सादर केले.Mudra events महेंद्र ढोले, आनंद मास्टे, गौरव टांकसाळे, अक्षय हरले, अशोक टोकलवार, अनिकेत दहिकर ह्या वादकांमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.ह्या कार्यक्रमात कोरस ची भूमिका सर्वांनी खूप छान सांभाळली. एक दर्जेदार कार्यक्रम मुद्रा इव्हेंट्स तर्फे सादर करण्यात आला.प्रायोजक म्हणुन नूतन ऑप्टिकल्स, सादिक पेंट्स, न्यू  तिरुपति अर्बन बँक यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सौजन्य;मनिषा काशीकर,संपर्क मित्र