प्लॅटफॉर्म बंदला तात्पुरती स्थगिती

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
नागपूर, 
Nagpur Central Railway Station : मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या विकास कामाने आता वेग घेतला असून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील बांधकाम सुरु होत आहे. यात प्रामुख्याने नवीन फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू करण्यात येत असल्याने हा प्लॅटफॉर्म तात्पुरता बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले मात्र आता त्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
 
 
Nagpur Central Railway Station
 
Nagpur Central Railway Station : दरम्यानच्या काळात ट्रेन क्र. १२२८९ दुरांतो एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे वळवण्यात आली आहे. तर ट्रेन क्रमांक २२८४६ हातिया-पुणे एक्स्प्रेस - प्लॅटफॉर्म क्रमांक ६ कडे वळवण्यात आली. तसेच ट्रेन क्रमांक १२१५२ शालीमार-एलटीटी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे, गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-सीएसएमटी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे वळवण्यात आली असून ट्रेन क्रमांक १२८३४ एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे वळवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.