संघमित्रा सुपर फास्ट एक्सप्रेस २२ तास विलंबाने

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
- रेल्वेगाड्या रद्द व लेटलतिफीने प्रवासी त्रस्त
- ३ रेल्वेगाड्या रद्द, १७ रेल्वेगाड्या विलंबाने
 
नागपूर,
Sanghmitra Super Fast Express : मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द व लेटलतिफीने प्रवासी त्रस्त आहे. शुक्रवारी १७ रेल्वेगाड्या विलंबाने तर ३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वेगाड्या रद्द होण्याची आणि वेळेवर गाडी न पोहोचण्याची मालिका कधी थांबणार, असा प्रश्न प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे.
 
 
Sanghmitra Super Fast Express
 
 (संग्रहित छायाचित्र )
 
 Sanghmitra Super Fast Express : उशिराने धावणार्‍या गाड्यांमध्ये प्रामुख्याने १२२९६- संघमित्रा सुपर फास्ट एक्सप्रेस २२ तास विलंबाने मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर आली तर २२५३५ रामेश्वरम- सुपर पफास्ट एक्सप्रेस, १४ तास, १२६२१ तामिळनाडू एक्सप्रेस१२ तास, १२६२२ तामिळनाडू - नवी दिल्ली १० तास, १२६१५ जीटी एक्सप्रेस ८ तास ३० मिनिट, १२६२६- केरला एक्सप्रेस ८ तास १५ मिनिट, १६०९४ लखनौ- चेन्नई एक्सप्रेस ७ तास ३५ मिनिट, २२८९४ हावडा - साईनगर एक्सप्रेस ७ तास १४ मि., २२६३१ मदूराई बिकानेर एक्सप्रेस ७ तास उशिरा रेल्वेस्थानकावर आली. तर १२६१६ जीटी एक्सप्रेस, ११२०२ शहडोल- नागपूर एक्सप्रेस, १२४३३ चेन्नई- नवी दिल्ली एक्सप्रेस या ३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.
 
 
रेल्वेगाड्या रद्द होणे आणि विलंबाने धावण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गुरुवारी ८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, १४ रेल्वेगाड्या विलंबाने नागपूर स्थानकावर दाखल झाल्या.