शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंतांचा सत्कार

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
- समाज घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच
- विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांचे प्रतिपादन
 
नागपूर, 
सर्व ज्ञान, गुरुपरंपरेचा गौरव दिवस म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करीत असतो. समाज घडवण्याचे सामर्थ्य हे शिक्षकांमध्येच असल्यामुळे शिक्षकाला सर्वोच्च स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंघचालक Shridhar Gadge श्रीधर गाडगे यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधुन महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सभासद आणि कर्मचार्‍यांच्या यशवंत व गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार व प्रा. अनिल सोले होते.
 
 
shikshak-sahakari-bank
 
Shridhar Gadge : शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून जाउ नये व अपयशाने खचून जाउ नये, असा मौलिक सल्ला प्रा. अनिल सोले यांनी दिला. गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार कार्यक्रमात प्रामुख्याने अव्दैत आगवन, सानिका अनवाने, ख्याती झाडे, यश बेले, सोमनाथ मुखर्जी, हिमानी घटे, हजारे, सुवेद आदित्य मोहिते, पुर्वी कुबडे, वीर चक्रधरे, अन्सारी मोहम्मद रयान मोहम्मद रफीक, प्रुथा टुले, चारूदत्त नरड, रिध्दिश ताजने, स्वराज मोहिते, सृष्टी घाटोळे, शार्दुल पाठक या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मोहीनी देशपांडे, सानिका जोशी, संजय कठाळे, पार्थ भागडे यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे आशिष वांदिले यांनी केले. तसेच बँकेचे अनिल मुळे, सुनिल पाटील, तुलाराम मेश्राम, विवेक जुगादे, डॉ. मनिषा वाकोडे, डॉ. रविंद्र येनुरकर, अ‍ॅड. विनायक राजकारणे, रविंद्र चिंचवडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अल्पेशकुमार जोशी तसेच बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन संचालिका डॉ.मनिषा वाकोडे यांनी केले तर आभार सुनिल पाटील मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.