दिल्लीतील उद्योग समागमात उदय सामंत यांचा सहभाग

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
राजधानी दिल्लीतील यशोभूमी येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेत उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागामार्फत उद्योग समागमाचे गुरुवारी आयोजन करण्यात होते. यात देशातील सर्व राज्यांचे उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना राज्याचे उद्योग मंत्री Uday Samant उदय सामंत या कार्यक्रमात उपस्थित होते. या समागमात औद्योगिक वाढ, सामान्य आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा आढावा मांडला आणि विकासाच्या अपार संधींचे सादरीकरण केले. त्यांनी विविध गुंतवणुकीच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
 
 
Uday Samant
 
Uday Samant सामंत यांनी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राने पुन्हा एकदा थेट विदेशी गुंतवणुकीत प्रथम स्थान मिळवले आहे, असे ते म्हणाले. देशातील सर्वांत मोठे आणि जगातील दहाव्या क्रमांकाचे वाढवण बंदर विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने ७६ हजार रुपये मंजूर केले आहे, ज्याचे नुकतेच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कोकणातील दिघी पोर्टला औद्योगिक शहर म्हणून मान्यता मिळाली असून, या प्रकल्पात ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पनवेल येथे ८३ हजार कोटी सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय, स्कॉडा कंपनी १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, टेक्सटाईल्स २०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. एकूणच, महाराष्ट्रात १.५० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.