आश्चर्यकारक...माचिसची काडी न वापरात मंत्राच्या सामर्थ्याने केली अग्नी प्रज्वलित

07 Sep 2024 11:27:28
नवी दिल्ली, 
Hawan kund viral video हिंदू धर्मात मंत्रांना खूप महत्त्व आहे. आपल्या वेद, पुराण आणि धार्मिक पुस्तकांमध्येही मंत्रांची शक्ती स्पष्ट केली आहे. असे म्हणतात की मंत्रांमध्ये खूप शक्ती असते. जेव्हा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य घडते तेव्हा यज्ञ केला जातो. ब्राम्हण यज्ञ किंवा हवनाच्या वेळी मंत्रांचा उच्चार करतात. हवनकुंडात हवनासाठी लाकूड ठेवल्यावर त्यात माचिसचा वापर करून  अग्नी प्रज्वलित करतात. पण असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर, एका ब्राह्मणांनी माचिसशिवाय दुरूनच हवनकुंडात अग्नी पेटवली आहे.
हेही वाचा : VIDEO: गुलाबराव पाटील यांनी अर्थ मंत्रालयाला म्हंटले 'नालायक' 
Hawan kund viral video
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, घरात काही शुभ कार्य केले जात आहे. त्यानिमित्त तेथे हवनाची जय्यत तयारी सुरू आहे. Hawan kund viral video घराच्या अंगणात अनेकजण जमले आहेत. काही ब्राम्हणही तिथे उपस्थित असतात. प्रांगणाच्या मध्यभागी हवनकुंड बांधण्यात आले आहे. हवनकुंडात लाकडे ठेवली जातात. काही पंडित दूर उभे आहेत. मुख्य पंडित त्या हवनकुंडात काही साहित्य टाकून मंत्र पठण करत आहेत.
व्हिडिओमध्ये ब्राम्हण सतत मंत्र पठण करत असल्याचे दिसत आहे. यानंतर ते हवनकुंडापासून थोडे दूर जाऊन उभे राहतात. तेथून ते मंत्र पठण सुरू करतात. Hawan kund viral video वास्तविक ते मंत्रांच्या बळावर हवनकुंडात अग्नी पेटवण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ब्राम्हण मंत्र पठण करतात तेव्हा काही वेळातच हवन कुंडातून धूर निघू लागतो आणि आग आपोआप प्रज्वलित होते. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
Powered By Sangraha 9.0