जयपूर,
Jaipur-leopard उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये लांडग्यांची दहशत अजून कायम असून, आदमखोर लांडगे ताब्यात आलेले नाहीत. आणखी काही जिल्ह्यांमध्ये वाघाची दहशत आहे. अशातच राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. तिथे एका खासगी रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला.
हेही वाचा : पाकिस्तानचे नशीब बदलणार...सागरी हद्दीत सापडले तेल आणि वायूचे साठे
Jaipur-leopard रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागला. रुग्णालय व्यवस्थापनाने याविषयी स्थानिक पोलिस आणि वनाधिकाऱ्यांना सूचना दिली. पण, त्यांच्या टिम्स पोहचेपर्यंत बिबट्या खिडकीतून उडी मारून, जंगलात पळून गेला होता.
Jaipur-leopard जयपूरच्या चौमू भागातील धमोड रुग्णालयात रात्री २ वाजताच्या सुमारास हा बिबट रुग्णालयात शिरतानाचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या फूटेजमध्ये बिबट बिनधास्तपणे रुग्णालयाच्या परिसरात फिरताना दिसतो आहे. बिबट्या रुग्णालयात शिरला तेव्हा त्या वॉर्डमध्ये एकही रुग्ण नव्हता. मात्र, बाजूच्या कक्षात रुग्ण-नातेवाईक होते. त्यांना हे कळताच एकच गोंधळ उडाला. सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
Jaipur-leopard गेल्या काही दिवसांपासून, जयपूरच्या जवळपासच्या भागात बिबट्यांचा वावर वाढला असून, प्रशासन आणि वनाधिकाऱ्यांसाठी हा काळजीचा विषय ठरतो आहे. याआधीही, शहरी भागात बिबट शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, वनाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.