- नाशिकहून थेट उज्जैन
नाशिक,
New Superfast Railway in Maharashtra महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट रेल्वेमार्ग बनणार आहे. खान्देशातील महत्त्वाकांक्षी मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेश जोडले जाणार आहेत. जेएनपीटी पोर्टसोबत कनेक्टिव्हिटीसाठी याचा फायदा होणार आहे.
मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग हा १८,०३६ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. इंदूर आणि मनमाड नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी पंतप्रधान-गती शक्ती मास्टर प्लॅनअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ३०९ किमी लांबीचा हा नवीन रेल्वेमार्ग असणार आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील संपर्कात नसलेले ६ जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.
सध्या इंदूरला गुजरातमार्गे जावे लागते. मुंबई आणि इंदूरला महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे आहेत. इंदूर-मनमाड रेल्वे मार्गामुळे थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग महाराष्ट्र मध्यप्रदेशातील सहा जिल्ह्यांना जोडणार आहे. या जिल्ह्यांमधून जाणार्या रेल्वे मार्गात ३० नवीन स्थानके बांधली जाणार आहेत.
१००० गावांना होणार फायदा
New Superfast Railway in Maharashtra : ६ जिल्ह्यांतून जाणार्या या नवीन रेल्वे मार्गाचा फायदा तब्बल १००० गावांना होणार आहे. ३० लाख प्रवाशांना पर्यायी मार्ग मिळणार आहे. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैैन-इंदूर विभागातील अनेक पर्यटन आणि स्थळांवरील पर्यटकांनाही हा मार्ग सोयीचा ठरेल. यामुळे फक्त व्यापारच नाही तर, पर्यटन वाढीलादेखील चालना मिळेल. २०२८-२९ पर्यंत हा नवा मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील १८६ किमी तर मध्यप्रदेशातील १७६ किमी अंतर या रेल्वेने कापता येणार आहे.