आता उद्धव ठाकरे ‘बेस्ट सीएम’ कसे होणार?

    दिनांक :07-Sep-2024
Total Views |
यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
‘दैव देते आणि कर्म नेते,’ अशी एक मराठीत म्हण आहे. ही म्हण Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंसाठी चपखल बसते. नशिबाने त्यांना सगळं काही दिलं. ते प्रबोधनकार ठाकरेंचे नातू बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत आणि म्हणूनच त्यांना शिवसेनेचं अध्यक्षपद मिळालं. इतकं चांगलं नशीब घेऊन येण्यासाठी भाग्यच लागतं. म्हणून उद्धव ठाकरे हे भाग्यवान आहेत, असंच म्हणावं लागेल. भाजपा आणि शिवसेना युती ही आधीच्या पिढीने घडवलेली युती होती आणि वर्षानुवर्षे टिकवून ठेवली होती. काही वाद झाले तरी काँग्रेस आणि डाव्या विचारांची येऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी ही युती टिकून राहिली. पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि यासाठी भाजपा तयार नव्हता. कारण, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा युती धर्म होता. या युती धर्मापेक्षा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले होते. भाजपा आणि शिवसेना यांच्यात जो वाद पेटला, तो मुद्यावरून. २०२४ ला सगळे वेगवेगळे लढले आणि भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. पण सत्तेवर बसण्यासाठीचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा जाहीर केला.
 
 
uddhav
 
शरद पवारांना तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव ठाऊक नव्हता. पवारांनी नेहमीच दुसर्‍या पक्षातल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवलं. पण स्वतःच्या पक्षातल्या नेत्याला त्यांनी या विराजमान होऊ दिलं नाही. याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषत: अजित पवारांमध्ये दिसून येत होती. आघाडीतला किंवा विरोधी पक्षातला नेता मुख्यमंत्री झाला तरी पवारांच्या हातात कमान असेल, याची ते काळजी घ्यायचे. पण भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना कळलं की देवेंद्र फडणवीस हे आपल्या हाताला लागणार नाहीत. तोपर्यंत शिवसेना सत्तेत सहभागी झाली भिजलेले राजीनामे त्यांनी खिशात ठेवले असले, तरी देवेंद्र फडणवीसांनी सरकार चालवून दाखवले. २०१९ साली मात्र Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यू-टर्न घेतील, असं फडणवीसांना वाटलं नव्हतं. काही झालं तरी ते काँग्रेससोबत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांना होता. मात्र, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले आणि काँग्रेसच्या संस्कृतीत आपलं स्थान निर्माण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न त्यासाठी सुरुवातीला बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट म्हणून करण्याचे टाळण्यात आले. इतकंच काय, तर बॅनरवरूनही त्यांची ही पदवी काढण्यात आली. आता ते हा शब्द वापरतात. कदाचित राहुल गांधी यांनी तशी अनुमती दिली असावी.
 
 
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं म्हणणं आहे की, ते नाईलाजाने भाजपासोबत होते. त्यांना भाजपासोबत राहायचं नव्हतं. आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे की, शिवसेना आणि भाजपाचा डीएनए एकच आहे. वादविवाद असले तरी शिवसेनेलाही तेच हवे आहे, जे भाजपाला हवं आहे. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे या मूळ ध्येयापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. कारण, वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सर्वस्व आहे. ही खुर्ची त्यांना शरद पवारांनी मिळवून पण ठाकरे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वेळा मंत्रालयात गेले. इतर वेळी ते घरीच निवांत बसून असायचे. स्वत:च्या कुटुंबाला वेळ द्यायचे. पण महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख त्यांना होता आलं नाही. खरं तर हा महाराष्ट्राचा अपमान होता. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्याबाबत अनेक मतभेद असू शकतील. परंतु, ते कार्यक्षम होते. उद्धव ठाकरे पहिले मुख्यमंत्री होते, जे कार्यच करत नव्हते. तरीसुद्धा वर्षातून सहा वेळा त्यांना बेस्ट सीएमची पदवी चाय-बिस्कुट मीडिया बहाल करत होती. हा सर्व्हे कोण करत होतं? का करत होतं? हे न समजण्याइतकी जनता मूर्ख मुळीच नव्हती. पुढे एकनाथ शिंदेंनी उठाव केला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. संजय राऊत म्हणत होते की, हे सरकार अनेक वर्षे टिकणार आहे आणि अडीच वर्षांत सरकार बदलले. पहिली गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, ठाकरे हे स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कर्तृत्वाने मुख्यमंत्री झाले नव्हते. त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात होता आणि पवारांना राज्यात फडणवीस नको होते. त्यामुळे ठाकरे हे अमरत्व घेऊन विराजमान झाले होते, हा उद्धव ठाकरेंचा गैरसमज होता.
 
 
आता Uddhav Thackeray ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यांना असं वाटत होतं की, लोकसभेत शरद पवार आणि काँग्रेसने आपल्याला जास्त जागा दिल्या म्हणून विधानसभेतही जास्त जागा मिळतील व मुख्यमंत्रिपदही मिळेल. त्यांचा हा भ्रम आता दूर होऊ लागला आहे. कारण, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवार यांनी फेटाळली आहे आणि काँग्रेसने तर ठाकरेंच्या या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जणू उद्धव ठाकरे यांना ते विचारातच घेत नाहीत, असा संदेश त्यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शक्ती तपासण्यात आली आणि ते मुस्लिम मतदारांच्या बळावर म्हणजेच काँग्रेस व काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांच्या बळावर काही खासदार निवडून आणू शकले, हे सिद्ध झाले आहे. ठाकरेंनी सर्वाधिक जागा लढून सर्वात कमी जागा मिळविल्या आहेत. आता त्यांना विधानसभेत जास्त मान मिळणार नाही. मात्र, आमचा एक डोळा फुटला तरी भाजपाचे दोन डोळे फुटले, असा विचित्र आनंद ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते साजरा दिसतात. भाजपालादेखील महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्या, पण भाजपा हा मोठा आणि अभ्यासू पक्ष आहे. ते आपला आकडा पुढच्या निवडणुकीत नक्कीच वाढवतील. पण उद्धव ठाकरेंचे काय होणार? मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी भाजपासारख्या चांगल्या मित्राची साथ सोडली, जो त्यांना प्रचंड मानसन्मानही देत होता. मग आघाडीत राहून त्यांना कमी जागा मिळाल्या आणि मुख्यमंत्रीही आलं नाही, तर उद्धव ठाकरे यांनी हा अट्टाहास करून काय कमावलं? याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत करू शकणार नाहीत. कारण, आत्मपरीक्षण करण्याची त्यांची सिद्धता नाही. कदाचित भाजपाला दूषणे देण्यातच ते आपला आत्मसन्मान समजून उरलेलं राजकारण करत राहतील. कदाचित तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांच्या पिताश्रींनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी पवारांविषयी विधाने आठवत राहतील. पण तेव्हा खूप वेळ झालेला असेल. शरद पवारांचे बोट धरून ‘बेस्ट सीएम’ होण्याच्या नादात त्यांनी त्यांचा पक्ष गमावला आहे, हे तेव्हा तरी त्यांना कळून चुकेल का?