नवी दिल्ली,
brij bhushan-vinesh-punia ‘मी मुलींचा गुन्हेगार नाही. खरे गुन्हेगार तर बजरंग आणि विनेश आहेत. त्यांच्या खोटारड्या आंदोलनाची स्क्रीप्ट लिहिणारे भूपेंद्र हुड्डा जबाबदार आहेत. या दोघांनी जवळपास २ वर्षे कुस्तीचा सराव आणि स्पर्धा अशा सगळ्याच अॅक्टीव्हिटीज बंद केल्या होत्या,' असा स्पष्ट आरोप कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजपा नेते ब्रजभूषण सिंह यांनी केला आहे. brij bhushan-vinesh-punia हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये दाखल झाले असून त्यांना निवडणुकीचं तिकिटही मिळालं आहे. यावरून ब्रजभूषण यांनी दोन्ही खेळाडूंवर निशाणा साधला.
brij bhushan-vinesh-punia जवळपास दोन वर्षांपूर्वी एका कारस्थानाचा एक भाग म्हणून हे आंदोलन सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनाक्रमाला राजकीय पृष्ठभूमी आणि पाठींबा असल्याचं मी आधीच म्हटलं होतं. काँग्रेस त्या आंदोलनाचा भाग होती, दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डाही त्यात सहभागी होते. ते आंदोलन खेळाडूंचं नव्हतंच. काँग्रेस त्या नाटकात सहभागी होती, असे आरोपही ब्रजभूषण यांनी केले आहेत.
brij bhushan-vinesh-punia एशियन गेम्ससाठी ट्रायल न देताच बजरंग पुनिया गेले होते, हे खोटं आहे का? एक खेळाडू एकाच दिवशी दोन वजनगटात ट्रयल देऊ शकतो का? स्वत: नियम मोडणारे हे खेळाडू नव्या खेळाडूंना संधी देण्याऐवजी स्वत:च स्पर्धेसाठी गेले. ही फसवणूक नाही का? देवाने त्यांना या फसवणुकीचेच फळ दिले आहे.
brij bhushan-vinesh-punia बृजभूषण सिंग यांच्या आरोपांना बजरंग पुनियाने सडेतोड उत्तर दिलं असून, विनेशला अपात्र ठरविण्यात आल्याचा यांना आनंद झाल्याचा आरोप त्याने केला. हे आता आम्हाला देशभक्ती शिकवतील का? आम्ही कधीच कोणावर अत्याचार झाला त्या महिला कुस्तीपटूचे नाव सांगितलेले नाही. त्यांनी स्वत:च विनेशचे नाव घेऊन गुन्हा केल्याचं बजरंग पुनियाने माध्यमांना सांगितलं.