दुसरा आमदार निवडा, मग माझी किंमत कळेल

08 Sep 2024 21:21:50
- बारामतीतून न लढण्याचे अजित पवारांचे संकेत
 
पुणे, 
जिथे पिकते तिथे विकत नसते, हेच खरे. तुम्ही आता दुसरा आमदार निवडा, त्यानंतर तुम्हाला माझी किंमत कळेल, असे बारामतीकरांना उद्देशून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Ajit Pawar अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभेची निवडणूक न लढण्याचेच संकेत दिले.
 
 
Ajit pawar
 
मी आता ६५ वर्षांचा झालो, न मागताही विकासकामे होत आहेत, तरीही बारामतीकर वेगळा विचार याची खंत आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या ठिकाणी आता दुसरा आमदार निवडा आणि त्यानंतर १९९१ ते २०२४ या कालावधीतील माझ्या कामांची तुलना करा, मग तुम्हाला सर्व काही कळेल. बारामतीच्या विकासासाठी मी काहीच कमी पडू दिले नसतानाही लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, याची खंतही अजित पवार यांनी बोलून दाखवली.
 
 
सकाळी लवकर उठतो, त्यावरून आमची काहीजण चेष्टा करतात. त्यात माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. बारामतीत काम करीत असताना कुणीही सांगावे की, आमच्यावर अन्याय झाला. गरज सरो आणि वैद्य मरो, असे व्हायला नको. विकास करायचा असेल तर घड्याळाला निवडून द्यावेच लागेल. ही निवडणूक महत्त्वाची आणि तुमच्या भविष्याची आहे, असे Ajit Pawar अजित म्हणाले.
Powered By Sangraha 9.0