पुणे,
Heavy rain in Maharashtra : राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असताना, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली. पुणे जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला. कोल्हापूरला यलो देण्यात आला. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Heavy rain in Maharashtra : हवामान विभागाच्या मते, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही क्षेत्र आता वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सोमवारपासून चार दिवस काही ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.