- पोलिस हवालदाराचाही डोळा सुजला
कोल्हापूर,
Kolhapur : Laser light eye bleeding : कोल्हापुरात गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. अनेक पथकांनी डिजेच्या तालावर गणरायाचे स्वागत केले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील उचलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका मंडळाने गणेशाच्या आगमन मिरवणुकीत डिजेसोबत एचडी लाईट्स व लावण्याने तीव्र प्रकाशामुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झाला; तर बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस हवालदाराचा डोळा सुजला.
Kolhapur : Laser light eye bleeding : येथील गणेश मंडळाने डिजेचा दणदणाटात गणरायाचे स्वागत केले. दरम्यान, लेझर लाईटचा वापर टाळा, असे आवाहन केल्यानंतरही काही मंडळांनी मिरवणुकीत मोठे एलईडी लाईट आणि लेझर लाईट वापरले. त्यामुळे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या गंभीर इजा झाली. लेझरचा प्रकाश थेट डोळ्यात गेल्याने या तरुणाच्या डोळा लाल होऊन त्यातून रक्तस्राव होऊ लागला. एवढेच नाही तर, या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस हवालदाराचा डोळादेखील सुजला. डोळ्यातून पाणी वाहू लागल्यानंतर तरुणाला आणि पोलिसाला शास्त्रीनगरमधील एका दवाखान्यात भरती करण्यात आले असता, तरुणाच्या बुबुळाला लेझरच्या किरणांमुळे इजा होऊन झाल्याचे निष्पन्न झाले, तर हवालदार युवराज पाटील यांचाही उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याचे कळले.