काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेत दाखल

    दिनांक :08-Sep-2024
Total Views |
- दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यावर भर
 
ह्यूस्टन, 
काँग्रेस नेते Rahul Gandhi राहुल गांधी रविवारी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आले असून, यात ते भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेकांशी संवाद साधतील. राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये आहे की, अमेरिकेतील डल्लास, टेक्सास येथे भारतीय नागरिक आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या जल्लोषपूर्ण स्वागतामुळे मला आनंद झाला आहे. या भेटीत दोन राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ होतील, अशा अर्थपूर्ण चर्चा आणि व्यावहारिक संभाषणांमध्ये सहभागासाठी मी उत्सुक आहे.
 
 
Rahul
 
डल्लास फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहुल गांधींचे उत्साहपूर्ण स्वागत झाले, असे पक्षाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, Rahul Gandhi राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून अमेरिकेत येत नाहीत, परंतु त्यांना कॅपिटल हिलवर वैयक्तिक स्तरावर विविध लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. राहुल गांधी राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधतील. ते थिंक टँकच्या लोकांशी करतील आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या जॉर्जटाऊन विद्यापीठात देखील संवाद साधतील, असे पित्रोदा यांनी राहुल गांधींच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले.