अमित शाह यांनी ‘वर्षा’वर घेतले गणरायाचे दर्शन

    दिनांक :09-Sep-2024
Total Views |
मुंबई, 
केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शाह यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांना औक्षण केले.
 
 
amit sh
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि वृषाली शिंदे यांच्याशी संवाद साधला.
लालबागच्या राजाचेही घेतले दर्शन
Amit Shah अमित शाह यांनी नंतर लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, नेते शरद पवार यांनीही खासदार सुप्रिया सुळे आणि नात रेवती यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.