- मुख्यत्री आदित्यनाथ यांची माहिती
लखनौ,
वारसा पुन्हा मिळवणे ही वाईट गोष्ट नाही. सनातनचे पुरावे आता संभलमध्ये दिसत आहेत. मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालवला जाणार नाही. वक्फ बोर्डाच्या नावाखाली बळकावलेल्या जमिनी परत घेणार असल्याचे उत्तरप्रदेशचे CM Yogi Adityanath मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
CM Yogi Adityanath : प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ वक्फ जमिनीवर आयोजित केल्याचा दावा एका मौलवीने केला होता, त्यावर संताप व्यक्त करीत योगी म्हणाले, वक्फ बोर्ड भू-माफियांचे मंडळ बनले आहे. सरकार वक्फ नावाखाली ताब्यात घेतलेल्या सर्व जमिनींची चौकशी करीत आहे. जिथे ‘वक्फ’ हा शब्द दिसतो, तेथे मूळ जमीन कोणाच्या नावावर नोंदवली गेली, हे तपासले जाईल आणि त्या जमिनी मूळ मालकांना परत केल्या जातील. जो स्वत:ला भारतीय समजतो, मनात भारतीय सनातन परंपरेबद्दल आदराची भावना आहे, ज्यांना भारताच्या चिरंतन परंपरेबद्दल आदर आहे, त्यांनी यावे, कोणीही रोखणार नाही. पण, जर कोणी चुकीच्या मानसिकतेने महाकुंभात येत असेल, त्याच्यासोबत वेगळ्या पद्धतीचा व्यवहार केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
महाकुंभ वसुधैव कुटुंबकम्चे विशाल रूप
CM Yogi Adityanath : योगी म्हणाले की, महाकुंभ हे एक असे ठिकाण आहे, जिथे जाती-पातीच्या भिंती नाहीशा होतात. येथे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. महाकुंभ कुटुंबकम्चे विशाल रूप आहे. राज्यात अनेक लोक आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी दबावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण, आज ते स्वतःला सनातनी मानतात आणि महाकुंभात येऊन पवित्र स्नानाचा अनुभव घेतात.