टोरंटो,
Justin Trudeau जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडाचा सत्ताधारी लिबरल पक्ष देशाच्या पुढील पंतप्रधानाची निवड ९ मार्च रोजी करणार आहे. पंतप्रधानाची निवड मतदानानंतर केली जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यातआले. लिबरल पार्टी ऑफ कॅनडाच्या अध्यक्षांनी गुरुवारी रात्री जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, नवीन पंतप्रधानांची निवड होईपर्यंत ट्रुडो पदावर कायम राहणार आहेत. मजबूत आणि सुरक्षित प्रक्रियेचा भाग म्हणून ९ मार्च रोजी पक्षांतर्गत मतदानातून नवीन नेता निवडला जाईल. निवड करण्यात आलेला नेता देशाचा पंतप्रधान असेल आणि त्यांच्याच नेतृत्वात २०२५ ची सार्वत्रिक लढविली जाणार आहे.
Justin Trudeau नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मार्क कार्नी आणि माजी अर्थमंत्री कि‘स्टिया फ़्रीलँड यांचे नाव चर्चेत आहे. ट्रुडो यांनी त्यांच्याच पक्षातून प्रचंड विरोध झाल्याने पदावरून ६ जानेवारी रोजी पायउतार व्हावे लागले. त्यांनी लागू केलेल्या धोरणामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. नॅनोसच्या ताज्या सर्वेक्षणात लिबरल पक्षाची लोकप्रियता विरोधी कंझर्व्हेटिव्ह तुलनेत घसरली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान तिन्ही विरोधी पक्षांनी २४ मार्च रोजी संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे जाहीर केले आहे.