हस्तकलेच्या वस्तूला देशविदेशात सर्वाधिक मागणी

10 Jan 2025 21:45:34
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचे उद्घाटन
 
नागपूर,
रोजगार क्षेत्रात हातमाग, हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या वस्तू निर्यात करता येतात. कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन तयार कराव्यात. देशविदेशात हस्तकलेच्या वस्तूला सर्वाधिक मागणी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर, सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
 
 
dakhin-madhya-gadkari
 
Nitin Gadkari : हातमाग हस्तकला ग्रामीण क्षेत्रात रुजवल्यास या क्षेत्रात समृद्धता आणि संपन्नता येईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दहा दिवस चालणार्‍या या मेळाव्यात दीडशेहून अधिक कलाकार आपले लोकनृत्य लोककला सादर असून या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी केले. कलाकारांना त्यांच्या कलाकृती विक्री करण्यासाठी हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यास ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा उपयोगी ठरत आहे. हस्तकला मेळाव्यात सायंकाळी ६.३० वाजता लोकनृत्यांचे सादरीकरण होणार आहे. मेळाव्यात सुमारे १५० हस्तकलाकार सहभागी झाले आहेत. ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यात राज्यांतील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे.
 
 
Nitin Gadkari : मंगळवार, १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केल्या जाणार आहे. कार्यक्रमात विविध राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते हस्तकलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात हँड ब्लॉक प्रिंटिंग, एम्ब्रॉयडरी, रंगकोट साडी, बनारसी साडी, लेदर, मेटल क्राफ्ट, ज्वेलरी, पंजा दारी जरी वर्क, मॅट विव्हिंग, बेल मेटल, काश्मिरी आर्ट, चंदेरी चिकनकारी, फुलकरी, पंजाबी यांचा समावेश आहे. यासोबतच फर्निचर, कार्पेट, हातमाग, हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Powered By Sangraha 9.0