- कुंभमेळ्यात येताच आले वैराग्य
प्रयागराज,
आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारी १५ वर्षीय Rakhi Singh राखी सिंह प्रयागराजला महाकुंभसाठी आली. या ठिकाणी आल्यावर तिच्या मनात अचानक वैराग्य निर्माण झाले. तिने साध्वी बनण्याची इच्छा आई-वडिलांना बोलून दाखवली. आई-वडिलांनी इच्छा समजून तिच्या इच्छेचा मान ठेवला. त्यानंतर तिला जुना आखाड्याच्या स्वाधीन केल्याची माहिती राखीची आई रीमा सिंह यांनी दिली.
Rakhi Singh : मुलीच्या साध्वी होण्याचे कारण सांगताना रीमा म्हणाल्या, जुना आखाड्याचे महंत कौशल गिरी महाराज गेल्या तीन वर्षांपासून आमच्या गावात भागवत कथेसाठी येत आहेत. तिथेच राखीने त्यांच्याकडून गुरू दीक्षा घेतली. पती संदीप आणि दोन मुलींसह मागील महिन्यात जुना आखाडा येथे शिबिरात आली असता मुलीने साध्वी बनण्याची इच्छा व्यक्त केली. ही प्रभूची इच्छा मानून आम्ही कोणताही विरोध केला नाही. राखीला आयएएस अधिकारी बनायचे होते, पण आता तिने साध्वी होण्याचा निश्चय केला आहे. कुटुंबाच्या इच्छेने राखीला आश्रमात स्वीकारले आहे, आता ती गौरी गिरी ओळखली जाईल. पिंडदान आणि इतर धार्मिक संस्कार १९ जानेवारीला केले जातील, असे जुना आखाड्याचे महंत कौशल गिरी महाराज यांनी सांगितले.