यवतमाळ,
Samaka Ayurveda Center : सामका आयुर्वेद येथे शुक्रवार १० जानेवारी रोजी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा, संशोधन आणि उपचार पद्धतींच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्यमंत्री जाधव यांनी देवी सामका महिला बहुउद्देशिय संस्था गोधणी यवतमाळद्वारा संचालित सामका आयुर्वेदच्या सेवा कार्याविषयी माहिती घेतली. तसेच गरजुंना अत्यंत माफक दरात आरोग्य सेवेसाठी केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
Samaka Ayurveda Center : त्यांनी सामका आयुर्वेद केंद्राच्या डॉक्टर, संशोधक कर्मचार्यांशी संवाद साधून आयुर्वेदिक औषधनिर्मिती आणि उपचार तंत्रज्ञानातील प्रगतीवर चर्चा केली. या प्रसंगी त्यांनी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी सरकारच्या योजनांबाबतही मार्गदर्शन केले. आयुर्वेदीक उपचार पद्धतींचा अधिक गती मिळावी आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सामका आयुर्वेदिक करत आहे, असे सांगून व शुभेच्छा दिल्या. सामका आयुर्वेदच्यावतीने एल. एच. पवार, देवयानी पवार यांनी पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. वैद्य पंकज पवार यांनी शाल व श्रीफळ देवून जाधव यांचा सत्कार केला व ‘आत्याईक चिकित्सा’ हे वैद्य पंकज पवारलिखित पुस्तक तसेच स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा केंद्रीय मंत्री जाधव यांना भेट दिली. आभारप्रदर्शन अॅड. घरडे यांनी केले.