महाकुंभातून उत्तरप्रदेशच्या तिजोरीत येणार २ लाख कोटी
दिनांक :10-Jan-2025
Total Views |
- ४० कोटी भाविक देणार अर्थव्यवस्थेला आधार
लखनौ,
Uttar Pradesh Mahakumbh : महाकुंभात ४० कोटी भाविक येणे अपेक्षित असून, यातून लाख कोटी रुपयांपर्यंतचा महसूल उत्तरप्रदेश सरकारच्या तिजोरीत जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात दिली. महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, यावेळी ४० कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.
Uttar Pradesh Mahakumbh : २०२४ मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत प्रयागराजमध्ये काशी दर्शनासाठी १६ कोटीहून अधिक भाविक आले, तर अयोध्येत १३.५५ कोटीहून अधिक भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. १३ जानेवारी ते २६ फेबृवारी या कालावधीत चालणार्या महाकुंभमेळ्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना महत्त्व मिळेल. हे आयोजन म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे.