शाळेत मुली कपडे बदलवत होत्या, चपरासीने बनवला व्हिडिओ

वाचा संपूर्ण प्रकरण

    दिनांक :10-Jan-2025
Total Views |
पुणे,
Video recording of students महाराष्ट्रातील पुण्यातील पाषाण परिसरातील एका नामांकित शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये, शाळेतील चपराशीने चेंजिंग रूममध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. ही घटना सोमवारी घडली. जेव्हा विद्यार्थिनी खेळाच्या पिरियडनंतर कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेल्या. त्यावेळी, आरोपी चपरासी तुषार सरोदेने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

 
  
recording
 
 
 
विद्यार्थिनींनी केली तातडीने कारवाई
विद्यार्थिनींनी चपराशीला चेंजिंग रूममध्ये पाहताच त्यांनी त्याला तिथून जायला सांगितले. परंतु,चपराशीने मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणि तो चेंजिंग रूममधील स्विच बोर्डवर ठेवला. हे सर्व विद्यार्थिनींच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेचच त्यांच्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट केला.

 
पालक आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिका
घटनेनंतर, विद्यार्थ्यांनी Video recording of students घरी जाऊन त्यांच्या पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर, पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटले. चपराशीला मुख्याध्यापकांनी घटनेबद्दल विचारले, पण त्याने सुरुवातीला ते नाकारले. नंतर, शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा चौकशी केली तेव्हा, त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची कबुली दिली.
 
पोलिस कारवाई आणि अटक
या प्रकरणी, शाळा व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर, शिपाई तुषार सरोदे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO आणि IPC च्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
कायदेशीर कारवाई आणि शाळेच्या सुरक्षिततेवरील प्रश्न
या घटनेमुळे शाळेच्या Video recording of students सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.शिपाई सारख्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहेत. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत व आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे.