बँकॉकच्या आकाशात फडकला महाकुंभचा ध्वज

11 Jan 2025 21:51:04
- प्रयागराजच्या अनामिकाने १३ फुटांवरून घेतली उडी
 
बँकॉक, 
Mahakumbh flag उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधील २४ वर्षीय अनामिका शर्माने नवा विक्रम केला आहे. हातात महाकुंभचा झेंडा फडकावत तिने बँकॉकमध्ये १३ हजार फूट उंचीवरून (स्काय ड्रायव्हिंग) उडी मारली. अनामिका १५ मिनिटे आकाशात महाकुंभचा ध्वज हातात पकडून होती. तिची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली असून, या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
 
girl
 
Mahakumbh flag अनामिकाने १३ जानेवारीपासून सुरू होणार्‍या महाकुंभापूर्वी ही अनोखी कामगिरी केली, ज्यात तिने आकाशातून ‘दिव्य-कुंभ, भव्य-कुंभ’चा संदेश दिला तसेच जगभरातील लोकांना महाकुंभात येण्याचे आवाहन केले. अनामिका महाकुंभाबद्दल म्हणाली, जगाच्या कल्याणासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा भारतातील सर्व प्राणीमात्र आपले योगदान देतात, ही आपली परंपरा आहे. अभिमानाने सांगते की, मी भारताची कन्या आहे आणि महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा मानव कल्याण कार्यक्रम आहे. हा भारताच्या शास्त्रार्थ परंपरेचा एक मोठा प्रकार आहे. अनामिकाच्या मते, जेव्हाही ती उंचावरून उडी मारते आणि आकाशात उडते, तेव्हा तिला नेहमीच असा भाव असायचा की, माझा भारत महान आहे.

कोण आहे शर्मा?
अनामिका ही भारतातील सर्वांत तरुण स्काय ‘सी’ परवानाधारक महिला स्काय ड्रायव्हर आहे. वडील अजय कुमार शर्मा यांच्या प्रोत्साहनाने तिने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी पहिली उडी घेतली. सध्या २४ वर्षीय अनामिकाकडे अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स पॅराशूट ऑर्गनायझेशनचा ‘सी’ परवाना आहे. अनामिकाचे वडील माजी वायुसेना अधिकारी अजय कुमार शर्मा हे सर्वांत मोठे आदर्श आहेत.

अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणानिमित्त केला विक्रम
Mahakumbh flag अनामिकाने यापूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य लोकार्पणानिमित्त श्री राम मंदिराचा ध्वज घेऊन १३ हजार फूट उंचीवरून उडी घेतली होती. अनामिकाने आपल्या कृतीतून भारतीय संस्कृतीच्या भक्तीचे अनोखे दर्शन घडवले. अनामिका महिला दिनाला आकाशातून उडी घेत यमुना, सरस्वती नदीच्या संगमावर पाण्यात उतरणार आहे.
Powered By Sangraha 9.0