वेध
- निलेश जोशी
Gramgeeta-Govansh-beef गाेपालांचा देश भारत, आला गाई-गुरे पूजित
परंतु गाई झाल्या खात, लक्षची नाही तयांकडे ।।
ग्रामगीतेतून वं. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी गाेवंश हत्येच्या विकृतीकडे या ओवींमधून लक्ष वेधले आहे. दुर्दैवाने आजही त्यांनी व्यक्त केलेल्या गंभीर मुद्याकडे लक्ष नसल्याचेच दिसून येते. खरं म्हणजे शासनाने राज्यात संपूर्ण गाेवंश हत्याबंदीचा कायदा केला. एवढेच नव्हे तर गाे-मातेला ‘राज्यमाता-गाेमाता’ असा दर्जाही प्रदान केला. पण गाेवंशाची दरराेज, सर्रास हाेणारी कत्तल अद्याप थांबली नसल्याचे चित्र आहे. Gramgeeta-Govansh-beef राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेत गाेवंश हत्या थांबविण्यासाठी पुढाकार यापूर्वीच घेतला असला तरी पाेलिस प्रशासनातील काहींच्या खाऊगिरी वृत्तीमुळे गाेवंशाची कत्तल सुरूच आहे. अकाेला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उघडकीस आलेल्या प्रकारामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. तेल्हारा तालुक्यात मंगळवारी मालवाहू वाहन नादुरुस्त झाले. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या अनेकांच्या नजरा त्यावर पडल्या.
पण सजग असणाऱ्या काहींना वाहनातून दुर्गंधी आली. त्यांनी थांबून त्याची चाैकशी सुरू केली. त्यात थाेडं अधिक धाडस दाखवून समाेर आलेल्यांनी वाहनात असलेल्या पाेत्यात काय आहे ते पाहण्यासाठी पाेते उघडले आणि सर्वांनाच धक्का बसला. Gramgeeta-Govansh-beef मालवाहू वाहनात असलेल्या पाेत्यात गाेवंशाची शिंगे हाेती. सतर्क असलेल्या नागरिकांनी पाेलिस प्रशासनाला ही बाब कळविली. पाेलिस प्रशासनानेही तत्काळ कारवाई केली. पाेत्यांमध्ये गाेवंशाची शिंगे असल्याचे समाेर आले हाेतेच. पण असंवेदनशीलता कशी असते याचाच अनुभव येथे आला. पाेलिस प्रशासनाने एकीकडे गाेवंशाची कत्तल झाली हे स्वीकारले पण किती गाेवंशाची कत्तल झाली याची खातरजमा न करता 16 क्विंटल गाेवंशाची शिंगे आढळल्याचे म्हणत पाेलिस माेकळे झाले. माध्यमात आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा दुसऱ्या दिवशी पाेलिसांनी गाेवंशाची शिंगे माेजली. तब्बल 9 हजार 800 शिंगे या वाहनात हाेती. म्हणजेच साधरणतः 4 हजार 900 गाेवंशाच्या कत्तलीनंतर या शिंगांची विल्हेवाट लावण्याकरिता ती नेली जात हाेती.
Gramgeeta-Govansh-beef अगदी स्पष्टच बाेलायचे तर सुमारे 5 हजार गाेवंशाची कत्तलीचा हा प्रकार पाेलिसांनी 16 क्विंटल शिंगे म्हणून गुंडाळला हाेता. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या गाेवंश कत्तलीमुळे देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी झाली. देशी गाईंच्या काही प्रजाती तर नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. 2019 मध्ये झालेल्या पशुगणनेत केवळ 46 लाख 13 हजार 632 देशी गाई असल्याचे समाेर आले. यात धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीच्या पशुगणनेशी तुलना केली असता ही संख्या 20.69 टक्क्यांनी घटली. कृषी आधारित ग्रामव्यवस्था आणि गाेवंश आधारित कृषी व्यवस्था हे आपल्या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य. ही व्यवस्था, वैशिष्ट्य कायम राहावे याकडे भारतीय चिंतनातून कृषी व्यवस्थेचा विचार करणाऱ्या तज्ज्ञांनी वेळाेवेळी लक्ष वेधले आहे. Gramgeeta-Govansh-beef वं. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी ग्रामगीतेचा 15 वा अध्याय गाे-संगाेपन, संवर्धन, रक्षण या महत्त्वाच्या विषयावर लिहिला आहे. राज्यातील संत परंपरेसह कृषी आधारित ग्राम व्यवस्था बळकट व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या सर्वच महानुभावांनी वेळाेवेळी जनजागरण केले.
पण तरीही स्वातंत्र्याेत्तर काळात केवळ गठ्ठा मतांच्या लालसेपाेटी स्वार्थी राजकारण्यांनी गाेरक्षण, गाेसंवर्धन याकडे दुर्लक्ष केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे स्वातंत्र्याेत्तर काळात झपाट्याने देशी गाईंची संख्या राेडावली. शेती आधारित अर्थशास्त्राला गती देणारी, विज्ञानाच्या कसाेटीवर मानवाला उपयाेगी असलेली देशी गाय, गाेवंश वाचावा म्हणून शासनाने राज्यात गाेवंश हत्याबंदी कायदा केला. तर गाईचे संगाेपन, संवर्धन व्हावे या हेतूने देशी गाईला ‘राज्यमाता-गाेमाता’ असा दर्जा दिला. असे असले तरी अखिल मानव जातीला उपकारक ठरणाऱ्या गाेवंशाची कत्तल केवळ जिव्हेचे चाेचले पूर्ण करण्यासाठी केली जाते. Gramgeeta-Govansh-beef नव्हे धर्मांध मानसिकतेचे प्रदर्शन करीत येथील बहुसंख्य समाजाला कमी लेखण्यासाठी गाेवंश हत्या केली जाते. ज्या वृत्तीला मानव जातीचे कल्याण कळत नसेल ती वृत्ती विकृतच म्हणावी लागेल. या विकृतीवर लगाम लावण्यासाठी तेल्हाऱ्यात घडलेल्या घटनेचा सखाेल तपास व्हावा. गाेवंश कत्तलीच्या हेतूने राज्यात हाेणारी वाहतूक, अवैध कत्तल बंद व्हावी तरच गाेवंश हत्याबंदी कायद्याचा उपयाेग हाेऊन ‘राज्यमाता-गाेमाता’ हा गाईला दिलेला दर्जा सार्थकी लागेल.
9422862484